शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाड्याच्या ४३९ कोटींच्या कामांना कात्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2017 00:11 IST

मराठवाड्यातील सुमारे ४३९ कोटी रुपयांच्या कामांना शासनाच्या अनुदान कपातीच्या धोरणामुळे कात्री लागली आहे. हा निधी अनुशेषामध्येदेखील घेतला जाणार नसल्यामुळे विभागाची एवढी कामे एकाच वेळी रद्द होण्याची नामुष्की ओढवली आहे.

विकास राऊत ।लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : मराठवाड्यातील सुमारे ४३९ कोटी रुपयांच्या कामांना शासनाच्या अनुदान कपातीच्या धोरणामुळे कात्री लागली आहे. हा निधी अनुशेषामध्येदेखील घेतला जाणार नसल्यामुळे विभागाची एवढी कामे एकाच वेळी रद्द होण्याची नामुष्की ओढवली आहे. पुढील महिन्यापासून सुरू होणा-या हिवाळी अधिवेशनात सरकारला या अनुदान कपातीवरून विरोधक घेरण्याची शक्यता आहे.शासनाने राज्यातील सर्व विभागांतील जिल्हा वार्षिक योजनेचे अनुदान ३० टक्क्यांनी कमी करण्याचा निर्णय घेतला असून, त्याचा परिणाम मराठवाड्यावर होणार आहे. सर्व विभागांतील महसूल उत्पन्नाचा आढावा घेतल्यानंतर हा निर्णय शासनाने घेतला असला तरी जीएसटी लागू झाल्यानंतर शासनाचे उत्पन्न वाढलेले असताना हा निर्णय कशासाठी, असा प्रश्न आहे.नोव्हेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत १४६६ कोटींच्या अनुदान मंजुरीपैकी प्राप्त तरतुदीपोटी १४०२ कोटींच्या तुलनेत ३०.७५ टक्के खर्च झाल्याचा आकडा नियोजन विभागाने दिलेल्या माहितीनुसार दिसत आहे; मात्र यातील ३० टक्के अनुदान कपात करण्यात येणार आहे. त्यामुळे थेट सुमारे ४२० कोटी रुपयांची कामे रद्दच होतील.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार विभागातील महसूल उत्पन्नावर परिणाम झाल्यामुळे शासनाने हा निर्णय घेतला आहे. सर्व बाजूंनी शासनाचे उत्पन्न गेल्या वर्षीच्या तुलनेत वाढत असताना अनुदान कपात होणे योग्य नसल्याची भावना काही अधिकाºयांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केली. रद्द होणाºया कामांमध्ये कोणत्या विभागाचा समावेश करावा, याबाबत शासनाने अजून काहीही स्पष्टीकरण दिलेले नाही.