शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

अंत्योदय अन्न योजनेला कात्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2017 00:42 IST

एक किंवा दोन सदस्य असलेल्या अंत्योदय योजनेच्या शिधापत्रिकाधारकांना योजनेतून वगळून प्राधान्य कुटुंब लाभ योजनेत या लाभार्थ्यांना वर्ग करण्यात येणार आहे. तसेच ३५ किलो धान्याऐवजी यापुढे पाच किलो धान्य मिळणार आहे. त्यामुळे तालुक्यातील १७०० लाभार्थ्यांना फटका बसण्याची शक्यता आहे. शासनाने आता गोरगरिबांच्या तोंडचा घासही हिरावला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कसोनपेठ : एक किंवा दोन सदस्य असलेल्या अंत्योदय योजनेच्या शिधापत्रिकाधारकांना योजनेतून वगळून प्राधान्य कुटुंब लाभ योजनेत या लाभार्थ्यांना वर्ग करण्यात येणार आहे. तसेच ३५ किलो धान्याऐवजी यापुढे पाच किलो धान्य मिळणार आहे. त्यामुळे तालुक्यातील १७०० लाभार्थ्यांना फटका बसण्याची शक्यता आहे. शासनाने आता गोरगरिबांच्या तोंडचा घासही हिरावला आहे.दाद्रिय रेषेपेक्षाही गरिब असणाºया लोकांची अन्न ही मुलभूत समस्या निकाली काढता यावी, म्हणून तत्कालीन शासनाने अंत्योदय अन्न सुरक्षा योजना राबविण्याचा निर्णय घेतला. यामध्ये अत्यंत गरिब असलेल्या लाभार्थ्यांचाही समावेश करून २५ किलो तांदूळ ३ रुपये दराने व १० किलो गहू दोन रुपये दराने उपलब्ध करून दिले. यामुळे विधवा, अपंग, कष्टकरी, मजूर व शेतकºयांना मोठा दिलासा मिळाला होता. यासाठी केंद्र शासनाच्या वतीने मदत दिली जात होती. आता केंद्र शासनामार्फत अनुदान मिळणे बंद झाले आहे. त्यामुळे अंत्योदय योजनेला घरघर लागली आहे. सुरुवातीला बीपीएलधारकांची साखर वाटप बंद केली. तसेच अंत्योदय शिधापत्रिकाधारकांना फक्त एक किलो साखर स्वस्त धान्य दुकानातून दिली जात आहे. अन्न व नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण विभागाच्या प्रधान सचिवांनी २१ सप्टेंबरला आदेश काढला. यामध्ये अंत्योदय योजनेत एक किंवा दोन सदस्य असलेल्या अंत्योदय लाभार्थ्यांना बाद करून प्राधान्य कुटुंब लाभ योजनेत समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी ३० सप्टेंबरपर्यंत मुदत दिली आहे. यामुळे ३५ किलो ऐवजी पाच किलो धान्य लाभार्थ्यांना मिळणार आहे. सोनपेठ तालुक्यात बीपीएलधारकांची संख्या ५ हजार ७० आहे. तर अंत्योदय योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या २ हजार १३५ आहे. या निर्णयाचा तालुक्यातील अंदाजे १७०० लाभार्थ्यांना फटका बसण्याची शक्यता आहे. परिणामी लाभार्थ्यांसमोर संकट निर्माण झाले आहे.