शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

पालिकेचा जम्बो आराखडा

By admin | Updated: February 23, 2016 00:41 IST

जालना: आगामी उन्हाळा पाहता नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागू नये म्हणून पालिकेने तब्बल १ कोटी १८ लाख ५० हजार रूपयांचा जम्बो आराखडा सादर केला आहे.

जालना: आगामी उन्हाळा पाहता नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागू नये म्हणून पालिकेने तब्बल १ कोटी १८ लाख ५० हजार रूपयांचा जम्बो आराखडा सादर केला आहे. प्रत्यक्षात एवढ्या मोठ्या आराखड्यास विभागीय आयुक्त मान्यता देण्याची शक्यता नसल्याने जालनेकरांना टंचाईचा सामना करावा लागण्याची चिन्हे आहेत. जालना शहरातील नवीन जालना भागातील २२ व जुना जालना भागातील २३ झोनसाठी पाणीपुरवठा करण्यात येतो. यात नवीन जालना भागात घाणेवाडी जलशयातून तर जुना जालना भागास जायकवाडी जलवाहिनीतून पुरवठा होतो. मात्र पालिकेच्या नियोजनाअभावी परिस्थिती भयावह आहे. नागरिकांना फेब्रुवारी महिन्यापासूनच भटकंती करावी लागत आहे. पुढील चार महिने पाणी कसे पुरेल, याची चिंता आत्तापासूनच नागरिकांना सतावत आहे. नगर पालिकेने विभागीय आयुक्तांना हा अहवाल सादर केला आहे. टंचाई नियोजनापेक्षा आर्थिक नियोजनच मोठे असल्याचे चित्र आहे. पालिकेने पाठविलेल्या टंचाई आराखड्यात परिपूर्ण व विस्तृत विवेचन पाठविले असले तरी शहरात असे अलबेल याची शाश्वती नाही. चालू विंधन विहिरींची संख्या ९५० एवढी असल्याचे म्हटले आहे. ५५२ विंधन विहिरींची पाणी पातळी बऱ्यापैकी आहे. ३४८ विंधन विहिरीवरून अत्यल्प पाणीपुरवठा होतो. ५० ठिकाणी वीजपंप बसवून पाणी घेतले जाते. पालिका या ठिकाणावरून सुरळीत पाणीपुरवठा होत असल्याचे म्हणत असले तरी अनेक विंधन विहिरी गायब आहेत. काही तर माहितच नाही. असे असूनही या कृती आराखड्यात नवीन विधिंन विहिरी घेऊन तसेच हँडपंप बसविण्यासाठी पालिकेने तब्बल २९ लाख ५० हजार रूपयांची मागणी केलेली आहे.दुरूस्तीसाठी पुन्हा १७ लक्ष रूपयांची मागणी केलेली आहे. विशेष म्हणजे याच आराखड्यात पालिकेने ९५० विंधन विहिरीतून बऱ्यापैकी पाणीपुरवठा नागरिकांना होत असल्योच म्हटले आहे. टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी २५ लक्ष रूपयांचे नियोजन करण्यात आले आहे. वडरवाडी येथे जलवाहिनीसाठी १८ लाख, सिद्धार्थ नगर, एसटी वर्कशॉप परिसरासाठी २० लक्ष तर सटवाई तांडा परिसरातील जलवाहिनीसाठी १० लक्ष रूपयांचा आराखडा तयार केलाआहे. (प्रतिनिधी)