शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

लोकवर्गणीतून बदलले शाळांचे रूपडे

By admin | Updated: February 5, 2017 23:32 IST

तुळजापूर : जिल्हा परिषदेच्या शाळांची खालावलेली प्रतिमा सुधारण्याचे काम त्या-त्या गावातील नागरिक व त्या शिक्षकांनीच लोकवर्गणीच्या माध्यमातून सुरू केल्याचे दिसू लागले आहे.

तुळजापूर : जिल्हा परिषदेच्या शाळांची खालावलेली प्रतिमा सुधारण्याचे काम त्या-त्या गावातील नागरिक व त्या शिक्षकांनीच लोकवर्गणीच्या माध्यमातून सुरू केल्याचे चित्र तालुक्यात दिसू लागले आहे. तालुक्यातील जि.प.च्या २०० शाळांपैकी १७१ शाळा ई-लर्निंग झाल्या असून, शासनाच्या कोणत्याही मदतीशिवाय लोकवर्गणीतून शाळा डिजिटल अथवा आयएसओ मानांकन मिळविण्याचे काम शिक्षण विभाग आणि शिक्षकांनी हाती घेतले आहे. सद्यस्थितीत कदमवाडी, आरळी (बु), कुंभारी, बसवंतवाडी या चार शाळांना आयएसओ मानांकन प्राप्त झाले असून, धोत्री, चव्हाणवाडी, हिप्परगा ताड, नांदुरी, काळेगाव, दिंडेगाव, कन्या प्र. मंगरुळ, येवती या शाळा आयएसओ नोंदणीसाठी प्रस्तावित आहे.या माध्यमातून शाळा डिजिटल करण्यासोबतच शाळेच्या सजावटीवरही भर देण्यात आला आहे. काही शाळेच्या प्रांगणात बोअरवेल्स, स्वतंत्र नळांची सोय, शाळेतील प्रांगणात व खोल्यांच्या भिंतीवर अनेक महापुरुषांचे फोटो आणि सामान्यज्ञानाची माहितीही देवून शाळा बोलकी करण्यात आली आहे. यामुळे विद्यार्थी प्रांगणात खेळत असतानाही ही चित्रे आकर्षित करून अभ्यासाची गोडी निर्माण करणारी ठरत आहेत. डिजिटल प्रकारच्या अभ्यासक्रमामुळे विद्यार्थ्यांची कौशल्ये वाढण्यास मदत होत आहे. पुस्तकातील धडे थेट पडद्यावर चित्रे, चित्रफितींच्या माध्यमातून दिसत आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे शाळेत येण्याचे प्रमाणही वाढल आहे. सोबतच शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातील संवादही वाढायला मदत होत आहे. लोकसहभाग व शिक्षकांच्या सहकार्याने शाळेत समृद्ध शिक्षणाचा पाया रचला आहे. शाळेत ई-लर्निंग, वॉटर फिल्टरद्वारे विद्यार्थ्यांना पिण्याचे शुद्ध पाणी, वापरातून वाया जाणाऱ्या पाण्याचे नियोजन करीत फुलझाडी, प्रत्येक भिंतीवर बोधचित्र व संदेश, सुंदर रेखाटन यासारख्या आवश्यक त्या सुविधांची उपलब्धी करून विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची गोडी निर्माण होण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे चित्र आहे. (वार्ताहर)