शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

विद्यापीठ, महाविद्यालयांमध्ये कडकडीत बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2018 00:32 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, शहरातील विविध महाविद्यालयांमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला. शहरातील कोणतेही महाविद्यालय बुधवारी उघडलेच नाही, तर विद्यापीठही सलग दुस-या दिवशी बंद होते. कर्मचारी, विद्यार्थी आणि प्राध्यापकांच्या सुरक्षिततेसाठी विद्यापीठ बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती कुलसचिव डॉ. साधना पांडे यांनी दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, शहरातील विविध महाविद्यालयांमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला. शहरातील कोणतेही महाविद्यालय बुधवारी उघडलेच नाही, तर विद्यापीठही सलग दुस-या दिवशी बंद होते. कर्मचारी, विद्यार्थी आणि प्राध्यापकांच्या सुरक्षिततेसाठी विद्यापीठ बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती कुलसचिव डॉ. साधना पांडे यांनी दिली.कोरेगाव-भीमा घटनेच्या निषेधार्थ भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. यामुळे शहरासह परिसरात शैक्षणिक बंद पाळण्यात आला. विद्यापीठामध्ये बुधवारी विद्यार्थी, प्राध्यापक आणि कर्मचाºयांनी स्वत:हूनच बंद पाळला. यामुळे दिवसभर विद्यापीठात शुकशुकाट होता. विद्यापीठाची मध्यवर्ती अभ्यासिकाही बंद असल्यामुळे विद्यार्थी वसतिगृहांमधून बाहेरच पडले नाहीत. अनेकांनी वसतिगृहातच बसून राहणे पसंत केले. विद्यापीठ प्रशासनाने पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या होणाºया परीक्षाही रद्द केल्यामुळे परीक्षा भवनातील वातावरणही शांतच होते. नागसेनवनातील महाविद्यालयांमध्ये उत्स्फूर्तपणे बंद पाळण्यात आला. महाविद्यालये उघडलीच नाहीत. सरस्वती भुवन शिक्षण संस्था, विवेकानंद महाविद्यालय, वसंतराव नाईक महाविद्यालय, शासकीय अभियांत्रिकी, तंत्रनिकेतन, औषध निर्माण, देवगिरी महाविद्यालयही बंदच होते. एक दिवसापूर्वीच बंदची हाक दिलेली असल्यामुळे कोणत्याही महाविद्यालय प्रशासनाने धोका पत्करला नाही. त्याचवेळी विद्यार्थीसुद्धा महाविद्यालयाकडे फिरकले नसल्याचे चित्र विविध शैक्षणिक संकुलांमध्ये दिसून आले. विविध महाविद्यालयांच्या प्रवेशद्वारांवर केवळ सुरक्षा रक्षकच आढळून आले.शहरातील शाळांमध्येही बंदशहरातील इंग्रजी, मराठी माध्यमांच्या शाळांनी बंद पाळला; मात्र शिक्षण विभागाने कोणत्याही सूचना दिलेल्या नसल्यामुळे काही जि. प. शाळा भरल्या होत्या, तर काही ठिकाणी विद्यार्थ्यांना शाळा बंद असल्याचा निरोप पोहोचला नाही. याचा परिणाम अनेक विद्यार्थ्यांना शाळेत जाऊन पुन्हा परत यावे लागले. यामुळे विद्यार्थ्यांसह पालकांना काही काळ धावपळ करावी लागल्याचा प्रकार काही शाळांमध्ये घडला.कोरेगाव-भीमा घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्र बंदची हाक दिल्यामुळे काही खासगी संस्थांनी सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून स्वत: शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यात महानगरपालिकेच्या शाळांनाही सुटी देण्यात आली होती; मात्र शिक्षण विभाग आणि शासनाच्या वतीने शाळा बंदचा कोणताही निर्णय देण्यात आला नाही. त्यामुळे नेहमीप्रमाणे काही विद्यार्थी सकाळी शाळेत गेले होतो; परंतु शाळा बंद होत्या. त्यामुळे आलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षकांनी शाळा बंद ठेवली आहे, तुम्ही घरी जा असे सांगितले. आधी निरोप न मिळाल्याने काहींना मनस्ताप सहन करावा लागला. जिल्हा परिषदेच्या शाळा सुरू असल्याचे प्राथमिक शिक्षणाधिकारी अश्विनी लाटकर यांनी सांगितले.गुरुवारी विद्यापीठाचे कामकाज नियोजित वेळेनुसार सुरू राहणार असल्याची माहिती कुलसचिव डॉ. साधना पांडे यांनी दिली, तसेच सर्व उपस्थित कार्यक्रम, तासिका, अभ्यासिका, परीक्षा भवन सुरू होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.