शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सिडकोच्या पाण्यावर जगतात शाळेची झाडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2016 23:42 IST

आॅर्चिड इंग्लिश स्कूल सिडको जलवाहिनीच्या पाण्यावर डल्ला मारून हे पाणी शाळेतील झाडांना देत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

वाळूज महानगर : एकीकडे सिडको वाळूज महानगरातील नागरिकांचे पाण्यासाठी हाल सुरू असताना दुसरीकडे आॅर्चिड इंग्लिश स्कूल सिडको जलवाहिनीच्या पाण्यावर डल्ला मारून हे पाणी शाळेतील झाडांना देत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सिडको जलवाहिनीला अनेक ठिकाणी गळती आहे. गळती असलेल्या काही ठिकाणी प्रशासनाने पक्षी व जनावरांची तहान भागावी यासाठी हौद बांधले आहेत. परंतु या गळतीचा काही जण गैरफायदा घेत आहेत. आॅर्चिड इंग्लिश स्कूलने तर हद्दच केली आहे. शाळेच्या गेटजवळ जलवाहिनीच्या व्हॉल्व्हला गळती आहे. व्हॉल्व्हवर झाडेझुडपे वाढल्याने गळती असल्याचे सहज लक्षात येत नाही. त्यामुळे या व्हॉल्व्हला छेडछाड करून गळती मोठी करण्यात आली आहे. या गळतीतून मोठ्या प्रमाणात बाहेर पडणारे पाणी आॅर्चिड स्कूलने थर्माकोल व प्लास्टिक बाटलीच्या साह्याने शाळेच्या आतील बाजूस वळविले आहे. विशेष म्हणजे पाण्याची गळती दिसू नये म्हणून शाळेने गळतीच्या बाजूला झाडांच्या फांद्या व हिरव्या रंगाची जाळी लावलेली आहे. वळते केलेले सिडकोचे पाणी गेल्या काही महिन्यांपासून शाळेतील झाडांना दिले जाते. फुकटचे पाणी मिळत असल्याने शाळेकडून झाडांसाठी मुबलक पाण्याचा वापर केला जात असल्याने शाळेतील झाडांचे वाफे कायम पाण्याने तुडुंब भरलेले दिसतात. तसेच या पाण्याचा वापर मैदानावर मारण्यासाठी व अन्य इतर कामांसाठीही केला जात असल्याचे काहींनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. सिडको प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत असल्याने नागरिकांमधून प्रशासनाच्या कारभाराविषयी शंका उपस्थित केली जात आहे. एकीकडे सिडको परिसरातील नागरिकांना आठवड्यातून केवळ दोनदा; तेही कमी दाबाने पाणी मिळत असल्याने नागरिकांचे पाण्यासाठी हाल सुरू आहेत.