शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात आनंदी देश धोक्यात! रशियन सैन्याने घेरले; युरोपमध्ये खळबळ, युक्रेननंतर..
2
अचानक बसला आग लागली, ५ जणांचा मृत्यू, काच फोडून चालक पळून गेला
3
४ दिवसांच्या संघर्षात भारत ठरला वरचढ, पाकिस्तानला मोठं नुकसान; न्यूयॉर्क टाईम्सचा रिपोर्ट
4
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
5
पाकिस्ताननंतर बांगलादेशनं IMF कडे पसरले हात, बुडत्या अर्थव्यवस्थेचं कारण देत 'इतक्या' पैशांची मागणी
6
आजचे राशीभविष्य १५ मे २०२५: आर्थिक लाभ संभवतात, दुपारनंंतर मात्र अनेकांचे नशीब बदलेल...
7
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
8
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
9
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
10
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
11
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
12
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
13
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
14
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
15
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
16
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
17
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
18
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
19
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
20
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?

शाळा तपासणी अधिकाऱ्यांना दमदाटी

By admin | Updated: July 20, 2014 00:34 IST

पाटोदा : तालुक्यातील तांबा राजुरी येथील मूकबधिर व मतीमंद विद्यालयाच्या तपासणीसाठी गेलेल्या जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांना संस्थेच्या एका सदस्यासह इतर काही लोकांनी दमदाटी केली.

पाटोदा : तालुक्यातील तांबा राजुरी येथील मूकबधिर व मतीमंद विद्यालयाच्या तपासणीसाठी गेलेल्या जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांना संस्थेच्या एका सदस्यासह इतर काही लोकांनी दमदाटी केली. प्रकरण वाढण्याची लक्षणे दिसताच अधिकाऱ्यांनी तेथून काढता पाय घेतल्याने पुढील प्रकार टळला. शिरूर येथील विद्याविकास संस्थेचे तांबा राजुरी येथे मूकबधिर व मतीमंद विद्यालय आहे. या संस्थेचे अध्यक्ष गंगाधर सुपेकर यांनी राजीनामा दिलेला आहे. हे प्रकरण धर्मादाय आयुक्तांकडे असल्याने अद्याप कागदोपत्री तेच अध्यक्ष आहेत. त्यामुळे अध्यक्ष व इतर सदस्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुंदोपसंदी आहे. या वादातूनच सुपेकर यांनी संस्थेतीलच काही कर्मचाऱ्यांना हाताशी धरून गावातीलच एका इमारतीमध्ये काही विद्यार्थ्यांना आणून ठेवलेले आहे. यास शासनाची अद्याप कुठलीही परवानगी नसल्याचे संस्थासचिव विठ्ठल तांबे म्हणणे आहे. दरम्यान, सध्या तांबा राजुरी येथे दोन ठिकाणी शाळा भरत असल्याने पालकांचीही द्विधा मन:स्थिती आहे. दरम्यान, नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यानंतर राजीनामा दिलेले अध्यक्ष व काही कर्मचाऱ्यांनी पालकांशी भेटून काही विद्यार्थ्यांना शाळेसाठी म्हणून घेऊन आले. यानंतर शाळा आहे, त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना न बसविता दुसऱ्याच ठिकाणी बसविले. यानंतर हे प्रकरण न्यायालयात गेले होते. यानंतर न्यायालयाच्या आदेशानंतर पांडुरंग पोकळे व छायाबाई केकान यांनी त्यांचे पाल्य ताब्यात घेऊन मूळ शाळेत पाठविले. या संस्थेत असे प्रकार घडत असतानाच सचिव विठ्ठल तांबे यांनी पोलिसांसह जि.प. च्या समाज कल्याण विभागाकडे महिनाभरापूर्वी तक्रार दिली होती. या तक्रारीवरून समाज कल्याण विभागातील अधिकारी मोराळे व लांडे यांनी शुक्रवारी रात्री ८ च्या दरम्यान शाळा तपासणी करण्यासाठी तांबा राजुरी येथे गेले. तपासणी सुरू असताना संस्थेच्या संचालक मंडळातील नवनाथ तांबे, संभाजी तांबे, गणेश गायकवाड, धनंजय तांबे व इतरांनी शाळेत येऊन तपासणी करणाऱ्या अधिकाऱ्यांशी तू-तू, मै-मै करीत प्रांगणात आरडा-ओरड केला. तसेच या अधिकाऱ्यांना दमदाटी केली. अचानक सुरू झालेल्या या प्रकाराने शाळा तपासणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांचीही भंबेरी उडाली. पुढे काही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी त्यांनी आपली तपासणी आटोपती घेत काढता पाय घेतला. या प्रकरणी संस्थासचिव तांबे यांनी पोलीस अधीक्षकांकडे तक्रारही दिली. याप्रकरणातील संबंधितांवर प्रतिबंधात्मक कारवाई केल्याचे पोनि हुंबे यांनी सांगितले. तर, झाल्या प्रकरणी वरिष्ठांना अहवाल पाठविणार असल्याचे जिल्हा परिषदेचे समाज कल्याण अधिकारी एस. एस. शेळके यांनी सांगितले. (वार्ताहर)अधिकाऱ्यांनी घेतला काढता पायशिरूर येथील विद्याविकास या संस्थेचे तांबा राजुरी येथे आहे मूकबधीर व मतीमंद विद्यालयया संस्थेचे अध्यक्ष व इतर सदस्यांमध्ये आहे वादया वादातूनच संस्थाध्यक्ष गंगाधर सुपेकर यांनी दिला आहे राजीनामाअद्याप हे प्रकरण आहे धर्मादाय आयुक्तांकडेसंस्थाचालकांमधील वादातून सुपेकर यांनी दुसऱ्याच ठिकाणी शाळा भरविल्यामुळे पालकांमध्येही अधिकृत शाळेसंबंधी आहे संभ्रमशाळा तपासणीकरिता आलेल्या जि.प.समाज कल्याणच्या अधिकाऱ्यांशी काहींनी घातली हुज्जत