शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

शहरात ३ जानेवारीपर्यंत शाळांना सुटी

By | Updated: November 22, 2020 09:01 IST

औरंगाबाद : राज्य शासनाने माध्यमिक विभागाच्या शाळा सुरू करण्यासंदर्भातील निर्णय स्थानिक प्रशासनावर सोपविला. महापालिका प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांनी ३ ...

औरंगाबाद : राज्य शासनाने माध्यमिक विभागाच्या शाळा सुरू करण्यासंदर्भातील निर्णय स्थानिक प्रशासनावर सोपविला. महापालिका प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांनी ३ जानेवारी २०२१ पर्यंत विद्यार्थ्यांना शाळेत अनुपस्थित राहण्याची मुभा दिली. शनिवारी दुपारी प्रशासकांनी हा निर्णय घेतला. विद्यार्थ्यांना शाळेत येण्याची सूट देण्यात आली असली तरी शिक्षकांना ऑनलाईन शिक्षण देण्याची सूचना करण्यात आली आहे.

शहरात इयत्ता ९ वी ते १२ वीपर्यंतच्या शाळा सुरू करण्यासाठी पालिकेच्या शिक्षण विभागाने तयारी सुरू केली. शिक्षकांची कोरोना तपासणी, वर्गखोल्यांचे सॅनिटायझेशन करून घेण्यात आले. मात्र, मागील तीन दिवसांपासून शहरात कोरोनाचे रुग्ण वाढण्यास सुरुवात झाली आहे. तीनच दिवसांत ४०४ रुग्ण नव्याने आढळले आहेत. त्यामुळेच शाळा सुरू करायच्या की नाही, असा पेच पालिका प्रशासनासमोर निर्माण झाला होता. शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी शाळा सुरू करण्यासंदर्भात स्थानिक प्रशासनाने निर्णय घ्यावा, अशा सूचना केल्या. शहरात शाळा सुरू करण्यासंदर्भात पालिका प्रशासक तथा आयुक्‍त आस्तिककुमार पाण्डेय यांनी शनिवारी दुपारी घोषणा केली. विद्यार्थ्यांना ३ जानेवारीपर्यंत शाळेत गैरहजर राहण्यास त्यांनी मुभा दिली. विद्यार्थ्यांच्या आरोग्याचे हित लक्षात घेऊन हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

शिक्षकांना दररोज शाळेत यावे लागेल

शहरात माध्यमिकच्या ३६१ शाळा आहेत. मनपा प्रशासक पाण्डेय यांच्या आदेशानुसार विद्यार्थी शाळेत येणार नसले तरी शाळा सुरू होणार आहेत. शिक्षकांना शाळेत यावे लागणार असून, ऑनलाईन शिकवणीदेखील घेण्याचे सूचित करण्यात आले आहे.

पुणे, मुंबईनंतर औरंगाबाद

पुणे, मुंबईनंतर औरंगाबाद शहरात माध्यमिकच्या शाळा बंदच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोना आजाराची दुसरी लाट येणार असे संकेत शासनाकडूनच देण्यात येत आहेत त्यामुळे मागील आठ ते दहा दिवसांपासून पालकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण होते. प्रशासनाने आज घेतलेल्या निर्णयामुळे पालकांना काही अंशी दिलासा मिळाला आहे.