शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

जि़प़ शाळांचा पट घटला; ३९ शिक्षक झाले अतिरिक्त

By admin | Updated: January 7, 2017 23:08 IST

लातूर : ग्रामीण भागात जि़प़ शाळांतील विद्यार्थी संख्या दिवसेंदिवस घटत आहे़

लातूर : ग्रामीण भागात जि़प़ शाळांतील विद्यार्थी संख्या दिवसेंदिवस घटत असून, इंग्रजी शाळा ग्रामीण भागात उघडल्यामुळे त्याचा परिणाम जि़प़ शाळांवर झाला आहे़ गतवर्षी पहिली ते सातवीपर्यंत १ लाख ४ हजार विद्यार्थ्यांचा पट होता़ यंदा ९८ हजार ६०० विद्यार्थ्यांचा पट असून यंदा ५ हजार ४०० विद्यार्थ्यांची संख्या जि़प़ शाळांतून कमी झाली आहे़ परिणामी, जिल्ह्यात ३९ शिक्षक अतिरिक्त झाले आहेत़लातूर जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या १२३५ शाळा आहेत़ या शाळांत पहिली ते सातवीपर्यंत ९८ हजार ६०० विद्यार्थी असून, गतवर्षी एवढ्याच शाळांमध्ये १ लाख ४ हजार विद्यार्थी होते़ यंदा ५ हजार ४०० विद्यार्थी घटले आहेत़ ग्रामीण भागामध्ये इंग्रजी शाळांचे पेव फुटले आहे़ त्यामुळे जि़प़ शाळांतील विद्यार्थी संख्येवर त्याचा परिणाम झाला आहे़ त्यातच संच मान्यतेबाबतचाही निर्णय नवा आला आहे़ ३० विद्यार्थ्यांमागे १ शिक्षक असे धोरण आहे़ ६० विद्यार्थ्यांमागे २ तर ६१ विद्यार्थ्यांमागे ३ शिक्षक असे नवीन धोरण आले आहे़ या धोरणामुळेही अतिरिक्त शिक्षक होण्याचे प्रमाण वाढत आहे़ विद्यार्थी संख्या कमी होत आहे़ शिवाय, विद्यार्थी संख्येनुसार शिक्षक संच मान्यता असे धोरण आल्यामुळे अतिरिक्तचाही घोळ वाढत आहे़ अतिरिक्त शिक्षक होत असले तरी लातूर जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये १०० पेक्षा अधिक शिक्षकांच्या जागाही रिक्त आहेत़ शिक्षक अतिरिक्त होऊ नयेत म्हणून पूर्वीप्रमाणे ग्रामीण भागातील शाळांसाठी वर्ग व तुकडीला २० पट संख्या व शहरासाठी २५ पट संख्या ठेवावी, अशी मागणी करण्यात येत आहे़ मात्र शासनाने संच मान्यतेचा आदेश मागे घेतलेला नाही़ शिवाय जिल्हा परिषदेतील विद्यार्थीसंख्या वाढविण्यासाठी प्रयत्न केले जात नाहीत़ त्यामुळे दरवर्षी जि़प़ शाळांतील विद्यार्थ्यांचा पट कमी होत आहे़ १२३५ शाळांपैकी जवळपास ३० ते ३५ शाळा एक शिक्षकी झाल्या आहेत़ केवळ विद्यार्थी संख्या रोडावत असल्यामुळे तीन शिक्षक, दोन शिक्षकी शाळा एक शिक्षकावर आल्या आहेत़ ज्ञान रचनावादी, प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र असे अनेक उपक्रम शासनामार्फत राबविण्यात येत असले तरी विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढविण्याचे प्रयत्न होताना दिसत नाहीत़