शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

माजी विद्यार्थ्यांनी केले शाळेचे डिजिटलायजेशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2017 17:32 IST

आपलेहि शाळेस काही देणे लागते या उदात्त भावनेने त्यांनी एकत्र येत ४ लाखाचा निधी जमा केला. यातून  शाळेसाठी १५  टॅब, प्रोजेक्टर, काँम्प्यूटर व  होम थिएटर घेऊन शाळेला डिजिटल केले. 

ऑनलाईन लोकमत 

औरंगाबाद, दि. २० : सिल्लोड तालुक्यातील भवन येथील जिल्हा परिषद शाळेचे माजी विद्यार्थी आज विविध क्षेत्रात यशस्वी असून उच्च पदावर आहेत. समाजातील प्रतिष्ठेचे स्थान हे केवळ शाळेमुळे मिळाले आहे, आपलेहि शाळेस काही देणे लागते या उदात्त भावनेने  त्यांनी एकत्र येत ४ लाखाचा निधी जमा केला. यातून  शाळेसाठी १५  टॅब, प्रोजेक्टर, काँम्प्यूटर व  होम थिएटर घेऊन शाळेला डिजिटल केले. 

'शिक्षण हे माणसाच्या विकासाचे मूळ आहे. शिक्षणाने माणूस बहुश्रुत व विवेकी बनतो' कर्मविरांच्या या वाक्यांची प्रचिती भवन  येथील जि. प. शाळेत अत्याधूनिक व सुसज्य डिजीटल क्लास रुम च्या लोकार्पण सोहळ्यात आली. याच शाळेत १९८६-८७ सालच्या पहील्या वर्गातील विद्यार्थांच्या तुकडीने सोशल मिडीयाच्या माध्यमातून २७ वर्षानंतर एकत्र येवून शाळा डिजीटल करण्याचा प्रेरणादायी उपक्रम राबवला. यामुळे आज शाळेत शिकणा-या सर्व सामान्य गरीब कुटूंबातील मुलांना शिक्षणासाठी अत्याधुनिक सेवा उपलब्ध झाल्या आहेत. 

या अत्याधूनिक व सुसज्य डिजीटल क्लास रुमचा लोकार्पण सोहळा आ. अब्दुल सत्तार यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी  माजी आमदार कल्याण काळे, नगराध्यक्ष  अब्दुल समीर, जि.प.उपाध्यक्ष केशवराव तायडे, शांतीलाल अग्रवाल, मुख्याध्यापक एच. बी.उरफाटे, सरपंच सुरेखा कळम, नंदकिशोर सहारे, काकाराव कळम, सुनिल लांडगे, विजय खाजेकर, दिपक सोनवणे, रूपेश ठाकूर व केंद्रातील शिक्षक, ग्रामस्थ तसेच आजी-माजी विद्यार्थी आदींची उपस्थिती होती. सूत्रसंचालन प्रमोद सुरडकर यांनी तर आभार देविदास बोर्डे यांनी मानले.

यांनी राबविला उपक्रम...भवन जिल्हा परिषद शाळेचे अजय खाजेकर, सुनील सातघरे, दशरथ तेलंग्रे, एकबाल शेख, शिवाजी तुपे, विलास सिरसाट, संतोष कावले, अंकुश देवरे, अंकुश बडक, किरण गोराडे, राजू काकडे, गजानन काकडे, देविदास बोर्डे, स्वप्ना माद्निकर, अनिता गावंडे, रोहिणी जोशी, कल्पना साखरे, अर्चना कळम, कल्पना गोंगे, संगीता तुपे, विमल कुंटे, सविता शिंदे, गीता तांबट, मंगल ठुबे या माजी विद्यार्थ्यांनी या अनोख्या उपक्रमात सहभाग घेतला. 

माझी शाळा प्रत्येक गावातील शाळेच्या माजी विद्यार्थांनी एकत्र येवून शाळेचा व गावाचा विकास साधावा.जेणेकरुन आजी  विद्यार्थी यातून प्रेरणा घेतील. यासोबतच यापुढे हि आम्ही  'माझी शाळा' या उपक्रमाच्या माध्यमातून मदतीस तत्पर आहोत. इंग्रजी शाळे सारख्या सुविधा आमच्या शाळेत मिळाव्या या हेतुने आम्ही ही शाळा डिजीटल केली. - अजय खाजेकर,  माजी विद्यार्थी, भवन जिल्हा परिषद शाळा.