शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

बसअभावी शाळा बंद

By admin | Updated: September 13, 2014 23:28 IST

नळणी : भोकरदन-नळणी-जाफराबाद ही बस सेवा गत महिनाभरापासून बंद करण्यात आली आहे. परिणामी नळणीच्या विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे.

नळणी : भोकरदन-नळणी-जाफराबाद ही बस सेवा गत महिनाभरापासून बंद करण्यात आली आहे. परिणामी नळणीच्या विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. काहीवेळा बस अभावी विद्यार्थ्यांची शाळा बुडत आहे. बस त्वरित सुरु करावी नसता तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.पूर्वी दिवसभरात भोकरदन-जाफराबाद मार्गावर चार ते पाच बस फेऱ्या होत. परंतु तडेगाव, गारखेडा, टाकळी गावाजवळ रस्त्यावर मोठे खड्डे पडल्यामुळे महामंडळाने या रस्त्यावरील बस बंद केली. भोकरदन ते नळणीपर्यंत रस्ता बस येण्यासारखा आहे. भोकरदन ते नळणीपर्यंत प्रवाशांची वर्दळ देखील चांगली आहे. भोकरदनला जाण्यासाठी विद्यार्थ्यांची संख्याही मोठ्या प्रमाणात आहे. यातून एसटी महामंडळाला चांगले उत्पन्न मिळते. मात्र रस्ता खराब झाल्याच्या नावाखाली या रस्त्यावरील बस सेवा बंद करण्यात आली आहे. भोकरदन हे तालुक्याचे ठिकाण असल्याने ग्रामस्थांसह विद्यार्थ्यांना या शहराशी दैनंदिन संपर्क ठेवावा लागतो. परंतु बस सेवा बंद झाल्याने नाईलाजास्तव खाजगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे. खराब रस्ता हा तडेगाव-जाफराबाद मार्गावर काही प्रमाणात आहे. भोकरदन, नळणी हा रस्ता बस येण्याजोगा असल्याची माहिती बरंजळा साबळे व नळणीचे सरपंचांनी आगारप्रमुखांना दिलेली आहे. मात्र आगार प्रमुखांनी सरपंचांच्या निवेदनाला केराची टोपली दाखवत बस फेऱ्या बंदच आहेत. आगार प्रमुखांच्या या मनमानी कारभाराला प्रवासी, विद्यार्थी वैतागले आहेत. भोकरदन ते नळणीपर्यंत बस सुरु न केल्यास जाफराबाद येथील आगार प्रमुखाकांच्या कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा सरपंच नारायण बाबळे यांनी दिला आहे. (वार्ताहर)