शहरं
Join us  
Trending Stories
1
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! 10 कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
2
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
3
“सरकारचे आर्थिक संतुलन ढासळले, गरीब समाजावर अन्याय”; पुरवणी मागण्यांवरुन जयंत पाटलांची टीका
4
पाकिस्तानविरुद्ध भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'ने राफेलची क्रेझ वाढवली; आता 'हा' देशही राफेल खरेदी करणार!
5
बाजार गडगडला! 'या' दिग्गज शेअर्सचे सर्वाधिक नुकसान; तज्ज्ञ म्हणतात अजूनही संधी फक्त..
6
'अटी लागू होतील...', भारत-अमेरिका व्यापार करारावर केंद्र सरकारची पहिली प्रतिक्रिया
7
बँक बॅलन्स झिरो असला तरी मिळेल 2 लाखांचा विमा, १० हजारांचं कर्ज; 'या' सरकारी योजनेत करा अर्ज
8
चीननं ठेंगा दाखवला तर एकत्र आले भारत आणि जपान, मुकेश अंबानीही संधीचं सोनं करण्याच्या तयारीत
9
STने प्रवास करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! आगाऊ आरक्षणात मिळणार १५ टक्के सवलत, कधीपासून सुरू?
10
‘ऐसा ठाव नाही कोठे, देव उभा उभी भेटे'; धर्मपुरीत दिसला भक्तीचा सोहळा
11
'हा तर मुल्ला मौलवीचा नमाजवाद...', वक्फ कायद्यावरुन सुधांशू त्रिवेदींचा INDIA आघाडीवर निशाणा
12
Viral Video : टेक्नोलॉजिया! एक पंखा अन् तीन खोल्यांमध्ये गारेगार वारा; देशी जुगाड पाहून तुम्हीही कराल कौतुक
13
तुकोबांच्या अभंगातून उत्तर देत धनंजय पोवारनं मटण खाण्यावरुन ट्रोल करणाऱ्यांचं केलं प्रबोधन, म्हणाला "सज्जन कसायाबरोबर मांस विकु लागला..."
14
धावपट्टीला स्पर्श करताच एका बाजूला झुकले, नंतर...; बोईंग विमानाचा मोठा अपघात थोडक्यात टळला
15
जुलैची सुरुवात ठरणार खास, ९ राशींना भरघोस लाभ; पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, शुभ-कल्याणकारक काळ!
16
टीम इंडियाच्या ' या ' स्टार क्रिकेटरसोबत केलेला 'वन नाईट स्टँड'; बॉबी डार्लिंगचा खुलासा
17
शेअर बाजारात घसरण, सबस्क्रायबर्सही होताहेत कमी; तरीही वाढतोय Vodafone Idea चा शेअर, कारण काय? 
18
J-K: भारतीय सैन्याने हाणून पाडला घुसखोरीचा डाव; सीमेजवळ पाकिस्तानी गाईड ताब्यात
19
नेटफ्लिक्सचा 'स्क्विड गेम 3' सुपरहिट की फ्लॉप? प्रेक्षकांच्या नाराजीमुळे शेअर बाजारात हाहाकार!
20
July Born Astro: कसा ओळखावा जुलैमधल्या लोकांचा स्वभाव? ब्रह्मदेवालाही कळणे कठीण; वाचा गुण-दोष!

शाळा सुटली अन् व्हॉटस् अ‍ॅपवर भरला वर्ग

By admin | Updated: December 16, 2014 01:08 IST

शांतीलाल गायकवाड , औरंगाबाद शाळा सुटली ... पाटी फुटली... चा आनंद सोमवारी शिक्षकांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत असल्याचा दिसला. शाळेच्या वेळेत व्हॉटस् अ‍ॅपवर चॅटिंग न करता

शांतीलाल गायकवाड , औरंगाबादशाळा सुटली ... पाटी फुटली... चा आनंद सोमवारी शिक्षकांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत असल्याचा दिसला. शाळेच्या वेळेत व्हॉटस् अ‍ॅपवर चॅटिंग न करता आल्यामुळे दिवसभर कोंडल्या गेलेल्या शिक्षकांनी शाळा सुटताच, व्हॉटस् अ‍ॅपवर पोस्टची भरमार केली; परंतु व्हॉटस् अ‍ॅपमधून मिळालेला दिवसभराचा विसावा आनंद देऊन गेला, अशा प्रतिक्रिया देण्यास मात्र गुरुजी विसरले नाहीत. शाळेच्या वेळेत व्हॉटस् अ‍ॅपवर पोस्ट टाकण्यात गुंतलेल्या शिक्षकांसंदर्भातील लोकमतमधून प्रसिद्ध झालेल्या वृत्ताने शैक्षणिक वर्तुळात उडालेली खळबळ अद्याप विरलेली नाही. रविवारी दिवसभर व्हॉटस् अ‍ॅपवर यासंदर्भात चर्चा होऊन ‘शाळेच्या वेळेत आम्ही फक्त अध्ययन आणि अध्यापन करू, तुम्हीही करा’ अशा पोस्ट बहुतांश शिक्षक व शिक्षक संघटनांनी एकमेकांना टाकल्या होत्या, तसेच सोमवारी शाळेच्या वेळेत व्हॉटस अ‍ॅप,मोबाईलचा वापर करू नका, असे आवाहनच सर्वांनी केले होते. त्या आवाहनाची बुज शिक्षक व शिक्षक संघटनांनी राखल्याचे सोमवारी दिवसभर सामसूम झालेल्या व्हॉटस् अ‍ॅपच्या कट्ट्यावरून दिसली. शिक्षक व शिक्षक संघटनांचा व्हॉटस् अ‍ॅप ग्रुप सकाळी साडेनऊ वाजेपर्यंत अ‍ॅक्टिव्ह होते. त्यानंतर दुपारी साडेचारपर्यंत या ग्रुपवर शांतता होती. अगदी बंद झाल्यागत हे ग्रुप भासत होते; परंतु जशी शाळा सुटली, प्रत्येक ग्रुपवर पहिल्या अर्ध्या तासात २५ ते ५० हून अधिक पोस्ट भराभर पडल्या होत्या. त्यानंतर व्हॉटस् अ‍ॅप बंदीचे फायदे- तोट्यावर चर्चा ग्रुपवर सुरू होती.