शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

एसआयटीमार्फत शिष्यवृत्तीची चौकशी

By admin | Updated: August 25, 2016 23:41 IST

हिंगोली : गडचिरोली येथे शिष्यवृत्तीत झालेल्या अनागोंदी कारभाराच्या अनुषंगाने हिंगोली जिल्ह्यातही काही अनागोंदी कारभार झाला आहे की काय?

हिंगोली : गडचिरोली येथे शिष्यवृत्तीत झालेल्या अनागोंदी कारभाराच्या अनुषंगाने हिंगोली जिल्ह्यातही काही अनागोंदी कारभार झाला आहे की काय? याची चाचपणी करण्यासाठी तब्बल पाच महिन्यांपासून एसआयटी पथक जिल्ह्यात तळ ठोकून आहे. यात शिष्यवृत्ती विभागाची कसून चौकशी केली जात असून, महाविद्यालय स्तरावरही भेटी देण्यात येत आहेत. जानेवारी महिन्यामध्ये गडचिरोलीत शिष्यवृत्तीमध्ये कोट्यवधीचा अनागोंदी कारभार समोर आला होता. या प्रकारामुळे अनेक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीपासून वंचित राहण्याची वेळ आली होती. तोच प्रकार हिंगोली जिल्ह्यात तर झाला नाही ना याची फार बारकाईने तपासणी केली जात आहे. सुरवातीला या पथकाने कार्यालयास अधून-मधून भेटी दिल्या. नंतर आॅडिट सुरु केले. शासनाकडून यासाठी स्वतंत्र समिती नेमली असून, या समितीअंतर्गत हे पथक एप्रिल महिन्यांपासून जिल्ह्यात तळ ठोकून आहे. पथकासह जालना येथील पोलिस अधीक्षकांनीही शिष्यवृत्ती विभागाला भेट दिली आहे. या चौकशीबाबत पूर्णत: गोपनीयता बाळगण्याचे बंधन असल्याने, कार्यालयात नेमके काय सुरु आहे. हे कोणाच्याच लक्षात येत नाही. या पथकामुळे शिष्यवृत्ती विभागात काम करणाऱ्यांना मात्र चांगलीच धासकी बसली आहे. हे पथक केव्हाही कार्यालयास भेटी देत आहे. आजघडीला पथकामार्फत जिल्ह्यातील सर्वच महाविद्यालयांच्या भेटी देण्याचा कार्यक्रम सुरु असून, त्या ठिकाणच्या शिष्यवृत्ती विभागातील लहान सहान कागदपत्रांची सूक्ष्म तपासणी केली जात आहे. या तपासणीस शिष्यवृत्ती विभागातील एखाद्या कर्मचाऱ्यांनी प्रतिसाद न दिल्यास त्या कर्मचाऱ्यावर प्रशासकीय कारवाई करण्याचेही परिपत्रक काढण्यात आले आहे. त्यामुळे ही चौकशी पूर्णत: पारदर्शक होणार असल्याचे सध्या तरी संकेत आहेत. (प्रतिनिधी)