शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

सावित्रीच्या ७७४० लेकींना शिष्यवृत्ती

By admin | Updated: March 17, 2016 00:03 IST

हिंगोली : शाळेतील मागासवर्गीय मुलींच्या गळतीचे प्रमाण कमी व्हावे, हा उद्देश समोर ठेवत जि. प. समाजकल्याण विभागाकडून मुलींना सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनेतून अर्थसहाय्य केले जाते.

हिंगोली : शाळेतील मागासवर्गीय मुलींच्या गळतीचे प्रमाण कमी व्हावे, हा उद्देश समोर ठेवत जि. प. समाजकल्याण विभागाकडून मुलींना सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनेतून अर्थसहाय्य केले जाते. या योजनेत हिंगोली जिल्ह्यातील जि.प. प्राथमिक, अनुदानित-विनाअनुदानित व मान्यताप्राप्त शाळांतील ७७४० विद्यार्थिनींना शिष्यवृत्तीच्या माध्यमातून अर्थसहाय्य करण्यात आले आहे.समाजातील दुर्बल घटकांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी शासनाकडून विविध योजना राबविल्या जात आहेत. विशेष म्हणजे मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीच्या माध्यमातून अर्थसहाय्य करून त्यांना आधार दिला जात असून जीवनमान उंचावण्याचे प्रयत्न सुरू आहेत. जेणेकरून दुर्बल घटकांतील मुले-मुली शिक्षणापासून वंचित राहणार नाहीत. तसेच पालकांनीही त्यांना नियमित शाळेत पाठवावे, हा त्यामागचा एकमेव उद्देश आहे. चालू शैक्षणिक वर्षामध्ये सावित्रीबाई फुले शिष्यवृती योजनेतंर्गत ५ वी ते ७ वी मधील एससी व व्हीजेएनटी प्रवर्गातील विद्यार्थिनींना दरमहा ६०० रूपये याप्रमाणे तर अनुसूचित जातीमधील ८ वी ते १० मध्ये शिक्षण घेणाऱ्या मुलींना दरमहा १ हजार रूपये याप्रमाणे शिष्यवृत्तीचा लाभ मिळाला असल्याची माहिती जि. प. समाजकल्याण विभागाने दिली. योजनेतंर्गत ६० लक्ष खर्च करण्यात आले आहेत. सदर रक्कम मुलींच्या बँक खात्यावर जमा करण्यात आली आहे. तसेच ज्या लाभार्थ्यांची रक्कम रहिली आहे, त्यांच्या खात्यावर पैसे जमा करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. अनुसूचित जातीमधील १६८० विद्यार्थी व २२५० विद्यार्थिनींना शिष्यवृत्तीचा लाभ देण्यात आला आहे.इंटरनेटमधील तांत्रिक अडचणी मुख्याध्यापकांची डोकेदुखी बनली असून वेळेत शिष्यवृत्ती अर्ज भरले जात नसल्याची ओरड आहे. त्यामुळे शासनकाडून अर्ज प्रक्रियेच्या तारखेत दरवेळेस बदल केजा जातो. जेणेकरून विद्यार्थी शिष्यवृत्तीच्या लाभापासून वंचित राहणार नाहीत.ग्रामीण भागात अनेक ठिकाणी इंटरनेटची सुविधा उपलब्ध नसते. त्यामुळे अर्ज करण्यासाठी तालुक्याच्या ठिकाणी यावे लागते. त्यात इंटरनेटच्या सुविधेत वारंवार होणारा बिघाड या विविध अडचणींळे अर्ज प्रक्रिया लवकर पूर्ण होत नसल्याचे दिसून येते. त्यामुळे आॅनलाईन अर्ज भरण्याची तारीख वारंवार बदलते.