शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

देखाव्यातून मंडळांनी केले प्रबोधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2017 23:47 IST

णेशोत्सव काळात शहरातील विविध गणेश मंडळांनी सजीव देखावे सादर केले असून, प्रत्येक देखाव्यातून वेगवेगळे सामाजिक प्रश्न हताळण्यात आले आहेत़ विशेष म्हणजे भारत- चीनच्या तणावाच्या पार्श्वभूमीवरही देखाव्यामधून नागरिकांना प्रबोधन केले जात आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : गणेशोत्सव काळात शहरातील विविध गणेश मंडळांनी सजीव देखावे सादर केले असून, प्रत्येक देखाव्यातून वेगवेगळे सामाजिक प्रश्न हताळण्यात आले आहेत़ विशेष म्हणजे भारत- चीनच्या तणावाच्या पार्श्वभूमीवरही देखाव्यामधून नागरिकांना प्रबोधन केले जात आहे़परभणी शहरात दरवर्षी गणेशोत्सव मोठ्या धामधुमीत साजरा केला जातो़ अनेक गणेश मंडळांना दोन ते तीन दशकांची परंपरा लाभली आहे़ या सर्व गणेश मंडळांनी यावर्षीही श्रींची प्रतिष्ठापना केली असून, उत्सवाच्या निमित्ताने सामाजिक प्रश्नांचे प्रबोधन होऊन सामाजिक स्वास्थ्य सुदृढ करण्याचा प्रयत्न मंडळांनी केला आहे़ दररोज सायंकाळी ७ ते १० या वेळेत शहरातील गणेश मंडळांनी साकारलेले देखावे पाहण्यासाठी भाविकांची गर्दी होत आहे़गणेशोत्सव काळात देखाव्यांच्या माध्यमातून प्रबोधनाचे काम केले जाते़ मागील काही वर्षांपासून खर्चिक आणि स्थिर देखावे तयार करण्यापेक्षा सजीव देखाव्यांवर मंडळांचा भर असल्याचे दिसत आहे़ आवाढव्य खर्च करून देखावा उभारणे जवळपास कालबाह्य झाले आहे़ त्यामुळे गणेशोत्सवाच्या या माध्यमातून समाजातील विविध प्रश्नांना हात घालत प्रबोधनाचा संदेश देण्याचे काम मंडळांनी केले आहे़दोन दिवसांपासून शहरातील सर्वच गणेश मंडळांनी हे देखावे नागरिकांसाठी खुले केले असून, सायंकाळी ७ वाजेपासून ते रात्री १० वाजेपर्यंत देखावे पाहण्यासाठी नागरिक गर्दी करीत आहेत़ विशेष म्हणजे गणेश विसर्जन मिरवणुकीतही स्वतंत्र देखावे केले जातात आणि बाप्पांना निरोप देतानाही एक चांगला संदेश घेऊन गणरायाचे विसर्जन केले जाते़