हिंगोली : जुन्या शहर भागात धुमाकूळ घालणाऱ्या माकडाला आज अखेर वन विभागाच्या पथकाने पकडले. मागील दोन दिवसांत तिघांना या माकडाने चावा घेतला होता.या भागात अचानकच हे माकड अवतरले. ते पाळीव नसल्याने उपद्रवी ठरत होते. त्याने दोन दिवसांत मारोती बांगर, शेरू पठाण व अन्य एकास कडाडून चावा घेतला. तर एकाला मारहाण केली. त्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण होते. या भागातील नगरसेवक गणेश बांगर यांनी त्याची तक्रार वन विभागाकडे केली. त्यानंतर कालपासून सापळा लावला होता. सिल्लोडहून मागविलेल्या पथकाने आज पुलानजीक नदी पात्रात माकड पकडले. ते बुलडाणा येथे नेऊन सोडले जाणार असल्याचे सांगण्यात आले. या ठिकाणी नगरसेवक बांगर यांच्यासह वनरक्षक बी. एम. पाटील, व्ही.आर.मुदीराज, ए.एस. उबाळे, जी.डी. यादव, वनपरिक्षेत्र अधिकारी एल.बी. दिवाने, परिमंडळ अधिकारी जमील अहेमद आदी उपस्थित होते. (जिल्हा प्रतिनिधी)
धुमाकूळ घालणारे माकड पकडले
By admin | Updated: November 8, 2014 23:38 IST