शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

रक्ताचा तुटवडा कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2017 00:18 IST

येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात रक्ताचा तुटवडा निर्माण झाला असून, सहा महिन्यांपासून रक्तसाठा वाढत नसल्याने रुग्णांची गैरसोय होत आहे़ रुग्णालय प्रशासन मात्र केवळ कागदोपत्री जनजागृती करण्यावरच धन्यता मानत असून रुग्णांसाठी ठोस पावले उचलण्याची गरज निर्माण झाली आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात रक्ताचा तुटवडा निर्माण झाला असून, सहा महिन्यांपासून रक्तसाठा वाढत नसल्याने रुग्णांची गैरसोय होत आहे़ रुग्णालय प्रशासन मात्र केवळ कागदोपत्री जनजागृती करण्यावरच धन्यता मानत असून रुग्णांसाठी ठोस पावले उचलण्याची गरज निर्माण झाली आहे़जिल्ह्यात उन्हाळ्यामध्ये पाणीटंचाई, मागील वर्षीच्या नोव्हेंबर महिन्यामध्ये चलन टंचाई अशा विविध प्रकारच्या टंचाईने नागरिक त्रस्त होते़ मात्र आता रक्ताची टंचाई भेडसावत असल्याने रुग्णांचा जीव टांगणीला लागला आहे़ जिल्हा रुग्णालयात सुसज्ज अशी रक्तपेढी उभारण्यात आली; परंतु, या रक्तपेढीत रक्तच नसेल तर उपयोग काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे़ जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या परिसरात ५०० रक्त पिशव्यांचा साठा असलेली रक्तपेढी उभारण्यात आली आहे़विशेष म्हणजे या ठिकाणी अद्ययावत असे रक्त विघटन केंद्रही कार्यरत आहे़ परभणी जिल्हा सामान्य रुग्णालयात दररोज ३० ते ४० रक्त पिशव्यांची आवश्यकता असते़ त्यामुळे किमान २५० रक्त पिशव्यांचा साठा रक्तपेढीमध्ये असेल तर तो आठ दिवस पुरु शकतो़ मात्र मागील काही महिन्यांपासून रक्तपेढीतील काही गटांचा रक्तसाठा हा चक्क शून्यावर येऊन ठेपला आहे़ याचा अर्थ रक्ताचा ठणठणाट असलयाने रुग्णांना ऐनवेळी धावपळ करावी लागते़ ठराविक गटाचे रक्त आवश्यक असल्यास नातेवाईक किंवा त्या रक्तगटाच्या व्यक्तीला शोधून रक्तदान करावे लागते़ या सर्व परिस्थितीत वेळेचा अपव्यय आणि मन:स्ताप रुग्णांच्या नातेवाईकांना सहन करावा लागत आहे़सहा महिन्यांपासून रक्ताचा तुटवडा असताना जिल्हा सामान्य रुग्णालयातून रक्तसाठा वाढविण्यासाठी फारसे प्र्रभावी प्रयत्न झाले नाहीत़ त्यामुळे रक्ताच्या साठ्यात ही वाढ झालेली नाही़ सोमवारी घेतलेल्या माहितीनुसार रक्तपेढीमध्ये ए आणि बी या दोन रक्तगटाची एकही रक्त पिशवी शिल्लक नव्हती तर एबी रक्तगटाच्या १५ आणि ओ या रक्तगटाच्या २५ पिशव्या उपलब्ध होत्या़ जिल्हा रुग्णालयात दररोज २५ ते ३० रक्त पिशव्यांची आवश्यकता लागते़ त्या तुलनेत दोन्ही रक्तगटांच्या मिळून ४० रक्त पिशव्या पेढीत उपलब्ध असल्याने रुग्णांना खाजगी रक्तपेढ्यांची दारे ठोठावी लागत आहेत़