शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

टंचाईच्या झळा तीव्र; टँकरने गाठले शतक

By admin | Updated: April 1, 2015 00:56 IST

जालना : जिल्ह्यातील ९४ गावे आणि २१ वाड्यांना ११३ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. यात अंबड तालुक्यात सर्वाधिक ४१ टँकरने बदनापूर तालुक्यात २६ टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे.

जालना : जिल्ह्यातील ९४ गावे आणि २१ वाड्यांना ११३ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. यात अंबड तालुक्यात सर्वाधिक ४१ टँकरने बदनापूर तालुक्यात २६ टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे. जिल्ह्यातील आठही तालुक्यांत टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे. तर जिल्ह्यातील २२८ गावांसाठी २२६ विहिरी अधिग्रहन करून पाणीपुरवठा करण्यात येत आहे. जालना जिल्ह्यात यावर्षी वार्षिक सरासरीच्या ५० टक्केपेक्षा कमी पाऊस झालेला आहे. त्यामुळे जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती ओढावलेली आहे. कमी पावसामुळे या वर्षी जिल्ह्यात अनेक ठिकाणी विहिरींची पाणी पातळी खालावली आहे. तसेच काही ठिकाणी धरणेही कोरडेठाक पडले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील ९४ गावे आणि २१ वाड्यांमधील २ लाख ९ हजार ८५४ ग्रामस्थांना पाणी टंचाईला समोरे जावे लागत आहे. या लोकांसाठी प्रशासनाने ११३ टँकरद्वारे २५८ खेपा करून पाणी पुरवठा सुरू केला आहे.जालना तालुक्यातील विरेगाव, सोलगव्हाण, नेर, डुकरी पिंप्री, सेवली, वरखेडा, मोती गव्हाण, एरंडवडगाव या सात गावांत १० टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. तसेच ५९ गावांसाठी ६१ विहिरींचे अधिग्रहन करण्यात आले.बदनापूर तालुक्यात २१ गावे आणि ६ वाड्यांना २६ टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे. यात रोषणगाव, धोपटेश्वर, बदनापूर, दगडवाडी, दुधनवाडी, कडेगाव, वाघु्रळ, बाजार वाहेगाव, देव पिंपळगाव, राजेवाडी, वंजारवाडी, ढोकसाळ, अकोला, भाकरवाडी, मांजरगाव, वरूडी, शेलगाव, वाकुळणी, मेहुणा, चिखली या गावांचा समावेश आहे. तसेच तालुक्यातील ३८ गावांसाठी ४० विहिरींचे अधिग्रहन करण्यात आलेले आहे.भोकरदन तालुक्यातील सावरखेडा, तळेगाववाडी, विटा, रामनगर, पिंप्री, पळसखेडा लोणगाव, या पाच गावात सात टँकरने पाणीपुरवठा सुरू करण्यात येत आहे. तसेच सात विहिरींचे अधिग्रहन करण्यात आलेले आहे. जाफराबाद तालुक्यातील भातोडी, ठोकवाडी, कुंभारी, पापळ, दुनगाव, यागावात पाच टँकरने पाणी पुरवठा सुरू करण्यात येत आहे. तसेच ८ विहीरीचे अधिग्रहन करण्यात आलेले आहे. परतूर तालुक्यात मागील आठवड्यापर्यंत एकही टँकरर सुरू नव्हते. या आठवड्यात तालुक्यातील सुरूमगाव येथे एका टँकरने पाणी पुरवठा सुरू करण्यात आलेला आहे. तर तालुक्यातील १० गावांसाठी ९ विहिरींचे अधिग्रहण करून पाणी पुरवठा करण्यात येत आहे.मंठा तालुक्यातील मंठा शहर, हिवरखेडा, पांगरी गोसावी, कंठाळा, गुलखंड या पाच गावात पाच टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे. तसेच ५ विहीरीचे अधिग्रहन करण्यात आलेले आहे. घनसावंगी तालुक्यातील घनसावंगी, मच्छिंद्रनाथ चिंचोली, राणी उंचेगाव, रवना, राहेरा, राहेरातांडा, बाहिरगाव, शिंदे वडगाव, पांडोळी, देव हिवरा, देवहिवरा वस्ती, देवनगर तांडा, डहाळेगाव, डहाळेगाव तांडा, रांजणी, चित्रवडगाव, भेंडाळा, बोरगाव, बोरगा खुर्द, जांबसमर्र्थ, शिंदखेड तांडा, चित्रवडगाव, बेलगाव, रामगव्हाण खुर्द, या गावांना आणि वाड्यांना २ शासकीय व १६ खाजगी असे १८ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. तसेच ४८ गावांसाठी ४४५विहीरीचे अधिग्रहण करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)