शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

कर्मचाºयाच्या नियुक्तीपूर्वीच घोटाळा सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2017 00:33 IST

महानगरपालिकेच्या पैशातून खाजगी ७६४ ग्राहकांची वीज बिले भरुन ७१ लाख २९ हजार रुपयांचा अपहार केल्या प्रकरणात आता नवीनच माहिती समोर आली आहे. या प्रकरणातील आरोपी तथा महावितरणचा निलंबित कर्मचारी राजेश घोरपडे याची या विभागात नियुक्ती होण्यापूर्वीच या घोटाळ्याला सुरुवात झाल्याचे कागदोपत्री स्पष्ट झाल्याने मूळ आरोपी कारवाईपासून बाजुला राहतात की काय, अशी शंका आता उपस्थित होऊ लागली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : महानगरपालिकेच्या पैशातून खाजगी ७६४ ग्राहकांची वीज बिले भरुन ७१ लाख २९ हजार रुपयांचा अपहार केल्या प्रकरणात आता नवीनच माहिती समोर आली आहे. या प्रकरणातील आरोपी तथा महावितरणचा निलंबित कर्मचारी राजेश घोरपडे याची या विभागात नियुक्ती होण्यापूर्वीच या घोटाळ्याला सुरुवात झाल्याचे कागदोपत्री स्पष्ट झाल्याने मूळ आरोपी कारवाईपासून बाजुला राहतात की काय, अशी शंका आता उपस्थित होऊ लागली आहे.महानगरपालिकेने जानेवारी २०१५ ते आॅगस्ट २०१७ या कालावधीतील वीज बिलापोटी महावितरणला ३० महिन्यांत ८ कोटी ७२ लाख ३२ हजार ४०० रुपये आरटीजीएसच्या माध्यमातून दिले होते. त्यातील ८ कोटी १ लाख ५९ हजार ४८६ रुपये महापालिकेच्या वीज बिलापोटी भरण्यात आले. उर्वरित खाजगी ७६४ ग्राहकांच्या नावे मनपाची ७१ लाख २९ हजार ६७ रुपयांची रक्कम भरल्या प्रकरणात कोतवाली पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये महावितरणमधील वरिष्ठ तंत्रज्ञ राजेश सटवाजी घोरपडे व महानगरपालिकेतील विद्युत विभागाचे सहायक अ़जावेद अ़ शकूर यांचा समावेश आहे. हे प्रकरण कोतवाली पोलिसांकडून तपासासाठी आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आले आहे.या शाखेकडून या प्रकरणाचा तपास सुरु असला तरी ‘लोकमत’ला मिळालेल्या माहितीनुसार या प्रकरणातील आरोपी तथा महावितरणमधील कर्मचारी राजेश घोरपडे यांची महावितरणमध्ये शहर शाखा क्रमांक ४ मध्ये रोहित्रांवरील नवीन सर्व्हे/ वीज चोरी, थकबाकी ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करणे/ वसुली करणे या कामासाठी १९ आॅक्टोबर २०१५ रोजी पदोन्नतीवर नियुक्ती करण्यात आली होती. तत्कालीन सहाय्यक अभियंता एन.डी. देशपांडे यांच्या स्वाक्षरीनिशी जावक क्रमांक ४/५३ नुसार घोरपडे यांना नियुक्तीपत्र देण्यात आले होते. पोलिसांमध्ये देण्यात आलेल्या फिर्यादीत मात्र हा घोटाळा जानेवारी २०१५ पासून सुरु झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. म्हणजेच घोरपडे यांच्या नियुक्तीपूर्वी ९ महिने अगोदरपासून प्रत्यक्ष घोटाळ्यास सुरुवात झाली होती. घोरपडे यांच्या नियुक्तीनंतर २३ पैकी २२ महिने (डिसेंबर २०१५ मध्ये मनपाचे बिल भरले नव्हते) अपहार झाल्याने ते या प्रकरणात दोषी असले तरी त्यांच्या पूर्वीही जे कोणी कर्मचारी या जागेवर सेवेत होते, तेही या प्रकरणात दोषीच आहेत. त्यांची नावे समोर आलेली नाहीत. पोलिसांना तपासामध्ये ही नावे उघड करावी लागणार आहेत. तसेच पोलिसांमध्ये फिर्याद दाखल करीत असताना महावितरणच्या वरिष्ठ अधिकाºयांच्या निदर्शनास ही बाब कशी काय आली नाही, असा सवाल उपस्थित होत आहे.