शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

एसबीआयचे दोन कोटी हडपले

By admin | Updated: March 19, 2016 01:09 IST

औरंगाबाद : बँकेला सर्व प्रकारच्या कमिशनपोटी मिळणारी रक्कम ज्या खात्यात असते

औरंगाबाद : बँकेला सर्व प्रकारच्या कमिशनपोटी मिळणारी रक्कम ज्या खात्यात असते त्या ‘पार्किंग’ खात्यावरच उपव्यवस्थापक महिलेने डल्ला मारला. या महिला अधिकाऱ्याने गेल्या साडेतीन वर्षांत तब्बल १ कोटी ९८ लाख २२ हजार ९२९ रुपयांची अफरातफर केल्याचा धक्कादायक प्रकार स्टेट बँक आॅफ इंडियाच्या अमरप्रीत हॉटेलजवळील शाखेत घडला. सहायक महाप्रबंधकांच्या फिर्यादीवरून गुरुवारी (दि.१७) या प्रकरणी क्रांतीचौक ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.स्नेहल पवार (३५, रा. निशांत रेसिडेन्सी, नंदनवन कॉलनी) असे गुन्हा दाखल झालेल्या उपव्यवस्थापक महिलेचे नाव आहे. या प्रकरणात बँकेने तिला निलंबित केले आहे. मागील १७ वर्षांपासून ती बँकेत काम करीत असून, क्लार्क पदापासून ती उपव्यवस्थापकपदापर्यंत पोहोचली आहे.याबाबत पोलिसांनी सांगितले की, अमरप्रीत हॉटेलजवळ एसबीआयची शाखा आहे. येथे ७ सप्टेंबर २०१५ मध्ये सहायक महाव्यवस्थापक म्हणून नंदकिशोर रामविलास मालू (५८, रा. वेदांतनगर) रुजू झाले. रुजू झाल्यावर त्यांनी बँकेतील सर्व खात्यांतील रकमेची तपासणी केली. यात त्यांना पार्किंग खात्यात गडबड झाल्याचे दिसून आले. त्यांनी या प्रकाराची चौकशी केली. त्यात उपव्यवस्थापक स्नेहल पवार हिने हा गैरव्यवहार केल्याचे चौकशीअंती समोर आले. शेवटी मालू यांनी या गैरव्यवहाराबाबत पोलीस आयुक्तांकडे तक्रार केली. हे प्रकरण आयुक्तांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविले. पोलीस चौकशीत असे आढळून आले की, बँकेच्या (पान २ वर)आरोपी स्नेहल पवार हिने बँकेच्या पार्किंग खात्यात अफरातफर करून रक्कम वळती केल्याचे उघडकीस आल्यानंतर तिचे पती विनोद पवार यांनी बँकेत १४ जानेवारी २०१६ रोजी ११ लाख ४४ हजार रुपये जमा केले. मात्र, उर्वरित रक्कम जमा होत नसल्याचे पाहून सहायक महाप्रबंधक नंदकिशोर मालू यांनी क्रांतीचौक ठाणे गाठून तिच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. पुढील तपास क्रांतीचौक पोलीस ठाण्याचे दुय्यम निरीक्षक हेमंत कदम हे करीत आहेत.