शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

‘हैदराबाद मुक्तिसंग्राम म्हणा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2017 00:16 IST

केवळ मराठवाडा मुक्तिसंग्राम असे म्हटले जाते, हे चुकीचे असल्याची खंत ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक प्रा. दिनकर बोरीकर यांनी व्यक्त केली.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : रझाकारी निजामाच्या जोखडातून हैदराबाद संस्थानच्या मुक्तीसाठी लढा उभारला होता. या लढ्याला आता मराठवाडा मुक्तिसंग्राम असेही नाव पडत आहे. मात्र, हा मराठवाडा नव्हे तर हैदराबाद मुक्तिसंग्राम होता. एकूण १६ जिल्ह्यांसाठी लढला. आता केवळ मराठवाडा मुक्तिसंग्राम असे म्हटले जाते, हे चुकीचे असल्याची खंत ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक प्रा. दिनकर बोरीकर यांनी व्यक्त केली.डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात हैदराबाद मुक्तिसंग्राम दिनानिमित्त स्वातंत्र्यसैनिकांच्या गौरव समारंभाचे आयोजन नाट्यगृहात केले होते. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. बी. ए . चोपडे, तर प्रा. दिनकर बोरीकर प्रमुख पाहुणे होते. या समारंभात हैदराबाद मुक्तिसंग्रामात उल्लेखनीय कार्य केलेले स्वातंत्र्यसैनिक पन्नालाल मंगीलाल गंगवाल आणि नागोराव विठ्ठलराव देशपांडे यांचा कुलगुरूंच्या हस्ते शाल, मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.यावेळी बोलताना प्रा. बोरीकर म्हणाले, कोणत्याही संघटित समाजाचा विकास होत असतो. निजामाच्या विरोधात हैदराबाद संस्थानातील सर्व जाती, धर्मातील लोक संघटित होऊन लढले. यामुळे यश मिळाले. आताही समाजाचा विकास करण्यासाठी सर्वांनी संघटित होऊन लढा देण्याची गरज असल्याचेही प्रा. बोरीकर यांनी स्पष्ट केले. कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी अध्यक्षीय समारोप केला. यात त्यांनी हैदराबाद मुक्तिसंग्रामातील घटनांना उजाळा दिला. या कार्यक्रमात पन्नालाल मंगीलाल गंगवाल यांनी वाढत्या वयामुळे मनोगत व्यक्त केले नाही. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. पुरुषोत्तम देशमुख यांनी केले. विशेष कार्य अधिकारी डॉ. वाल्मीक सरवदे यांनी आभार मानले. या कार्यक्रमापूर्वी नाट्यगृह परिसरात कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यार्थी कल्याण मंडळ संचालक डॉ. मुस्तजीब खान, प्रकाश आकडे आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाला प्राध्यापक, अधिकारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.