शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रज्ञासिंह, पुरोहितसह सातही जणांची मुक्तता; मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याचा १७ वर्षांनी निकाल
2
न्या. लाहोटी म्हणाले, “मालेगाव स्फोटाचा निकाल पीडितांच्या कुटुंबीयांसाठी वेदनादायक”
3
५ न्यायाधीश, २ तपास यंत्रणा, १७ वर्षे प्रतीक्षा; मालेगाव खटल्यातील सर्व आरोपींची सुटका
4
अलमट्टी धरणाची उंची वाढवू नये, कर्नाटक सरकारला निर्देश द्यावे; CM फडणवीसांचे केंद्राला पत्र
5
माणिकराव कोकाटेंना रमीचा डाव भोवला, ‘कृषी’ गेले, आता ‘खेळ’मंत्री; दत्ता भरणे नवे कृषिमंत्री
6
आबा नाही म्हणाले अन् मामांना मिळाले ‘कृषी’; कोकाटेंचा निर्णय का झाला, पडद्यामागे काय घडले?
7
भारतीय अर्थव्यवस्था सध्या मृतावस्थेत, ट्रम्प खरे बोलले! विरोधी पक्षनेते राहुल गांधींची टीका
8
खड्डेमुक्त रस्ते हा घटनेतील मूलभूत हक्क; जबाबदारी राज्य सरकार टाळू शकत नाही: सुप्रीम कोर्ट
9
EVM फेरफार अशक्य, तपासणीत पुन्हा एकदा सिद्ध, राज्यातील मतदारसंघांमध्ये तपासणी; आयोगाचा दावा
10
एक दिवस पाकिस्तान भारताला तेल विकू शकेल: डोनाल्ड ट्रम्प; अमेरिका-पाकचा व्यापार करार
11
ट्रम्प टॅरिफ: सर्वसामान्य अमेरिकनांच्या खिशाला फटका, अर्थव्यवस्थेला झटका, ५ लाख जॉब जाणार
12
मिठी नदी घोटाळ्याप्रकरणी EDचे मुंबईत ८ ठिकाणी छापे; बनावट सामंजस्य करार,  कंपन्यांवर कारवाई
13
मान्सूनच्या दुसऱ्या टप्प्यात अधिक पाऊस पडणार; भारतीय हवामानशास्त्र विभागाचा अंदाज
14
प्रांजल खेवलकरच्या लॅपटॉपमध्ये अनेक महिलांचे पार्टी अन् त्यानंतरचे आक्षेपार्ह व्हिडिओ!
15
IND vs ENG 5th Test Day 1 Stumps: नायर-वॉशिंग्टन जोडी जमली अन् टीम इंडियावरील मोठं संकट टळलं!
16
माल चाहिए क्या? xxx वाला? विचारल्यानंतर खेवलकर म्हणाले होते, 'ठेवून घ्या'! चॅटिंग आलं समोर
17
Karun Nair Fifty : 'त्रिशतकवीर' करुण नायरच्या भात्यातून ३१४६ दिवसांनी आली 'फिफ्टी'!
18
Nashik Crime: भयंकर! पत्नीला गुंगीचे औषध पाजून नग्नावस्थेत बनवले व्हिडिओ, दोन वर्ष डान्स बारमध्ये नाचायला लावले
19
उत्तर प्रदेशमधील मंत्र्यांनी आपल्याच सेक्रेटरीला पाठवलं तुरुंगात, कारण वाचून तुम्ही म्हणाल...
20
IND vs ENG: टीम इंडियासोबत पाचव्या कसोटीत 'चिटींग'? पंच कुमार धर्मसेना यांच्यावर नेटकऱ्यांचा आरोप

सावतावाडी तलावाला भेगा

By admin | Updated: October 12, 2016 01:13 IST

वैजापूर : तब्बल सहा वर्षांनंतर १०० टक्के भरलेल्या वैजापूर तालुक्यातील खंडाळा येथील सावतावाडी लघु तलावाच्या भिंतीला ८०० फुटापर्यंत सरळ रेषेत भेगा पडल्याने खळबळ उडाली आहे.

वैजापूर : तब्बल सहा वर्षांनंतर १०० टक्के भरलेल्या वैजापूर तालुक्यातील खंडाळा येथील सावतावाडी लघु तलावाच्या भिंतीला ८०० फुटापर्यंत सरळ रेषेत भेगा पडल्याने खळबळ उडाली आहे. तलावाची तात्काळ दुरुस्ती न केल्यास परिसरातील खंडाळा, पानगव्हाण व सावतावाडी गावाला मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याने या गावांत घबराट पसरली आहे. खंडाळा येथील सावतावाडी लघु तलावाचे काम १९७२ मध्ये झालेले आहे. २०१० मध्ये या तलावाच्या भिंतीची ३ फुट उंची वाढविण्यासाठी पाटबंधारे विभागाने एका गुत्तेदाराला काम दिले होते. मात्र संबंधित गुत्तेदाराने मुरूम,दगडाची पेचिंग न करता केवळ जेसीबीद्वारे तलावामधील काळी माती टाकून बिले उचलली असल्याचा आरोप परिसरातील नागरिकांनी केला आहे. सहा वर्षानंतर हा तलाव १००टक्के भरला असून आजघडीला या तलावात ०.५६१ द.ल.घ.मी. जलसाठा असून उपयुक्त जलसाठा ०.४७७ द.ल.घ.मी. इतका आहे. गेल्या महिन्यापासून या परिसरावर वरुणराजा चांगलाच मेहरबान आहे. सततच्या दमदार पावसामुळे हा तलाव ओसंडून वाहत आहे. मात्र काही दिवसांपासून तलावाच्या भिंतीला भेगा पडत असल्याचे परिसरातील नागरिकांना लक्षात आल्याने त्यांनी तातडीने याची माहिती खंडाळा ग्रामपंचायतला कळवली. सरपंच जमुनाबाई संजय सूर्यवंशी, उपसरपंच साजीद खान यांनी तातडीने काही सदस्य सोबत घेऊन तलावाची पाहणी केली. तलावाच्या भिंतीला ८०० फुट लांब व ३ फुट खोल भेग पडल्याचे दिसून आले. ग्रामपंचायतीने याची माहिती तातडीने संबंधित विभागाला कळविल्यानंतर मंगळवारी पाटबंधारे विभागातील शाखा अभियंता डी.पी.पाटील, स्थापत्य अभियंता बी.पी.गायके यांनी तलावाची पाहणी केली. यावेळी परिसरातील नागरिकांनी तलावावर गर्दी केली होती.