निलंगा : तालुक्यातील बेंडगा-जामगा-गुंजरगा या गावातील विद्यार्थ्यांसाठी मंगळवारी एसटी न थांबवल्याने विद्यार्थ्यांची शाळा बुडाली असून संतप्त विद्यार्थिनींनी मुख्याध्यापकाकडे तक्रार केली आहे़ आमच्यासाठी स्वतंत्र एसटी नाही सोडली तर आंदोलन करु असे या सावित्रीच्या लेकींनी ठणकावून सांगितले़अनसरवाडा येथील शिवाजीराव पाटील निलंगेकर विद्यालयात ८ वी ते १० वी इयत्ता साठी गुंजरगा येथून ३६ मुली व ४ मुले, जामगा येथून ११ मुली, २ मुले तर बेंडगा येथून १८ मुली असे एकूण ६५ मुली व ६ मुले शालेय शिक्षण घेण्यासाठी येतात़ यासाठी ते एसटी महामंडळाच्या गाडीतून ये-जा करतात़ मात्र एसटी चालक-वाहकाच्या मुडवर ते विद्यार्थ्यांना येवू द्यायचे की नाही ठरवतात़ कधी विद्यार्थीनींना एसटीत प्रवेश देतात तर कधी न थांबवल्यामुळे विद्यार्थ्यांना पायपीट करावी लागते़ मंगळवारी निलंगा-बोरसुरी येळणूर चांदोरी-बोरसूरी करून माघारी फिरली़येळणार गुंजरगा-जामगा येथे आली़ गाडीमध्ये जेम-तेम प्रवाशी होते़ मात्र विद्यार्थ्यांची गर्दी पाहून तुम्ही मागच्या गाडीने या असे म्हणून डबल बेल मारली व गाडी विद्यार्थ्यांना न घेताच निघाली़ या विद्यार्थ्यांनी गाडीचा पाठलाग केला व गाडी थांबवण्याची विनंती केली मात्र चालक-वाहकाला याचे काहीच देणे-घेणे नव्हते़ बराच वेळ विद्यार्थ्यांनी दुसऱ्या बसच्या प्रतीक्षेत पायपीट करत शाळा गाठली़ व घडलेला प्रकार मुख्याध्यापक एस़एऩशिरमाळे यांना सांगीतला व गुंजरगा येथील मयुरी भोसले, आरती शिंदे, वैशाली शिंदे, शैलजा पाटील, (सर्व १० वी) तर जांमगा येथील मयुरी पवार ८ वी, स्वाती धुमाळ बेंडगा ९ वी, दिपाली धुमाळ ८ वी यांनी निलंगा आगार प्रमुखांची भेट घेऊन बसची व्यवस्था न केल्यास आंदोलन करणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला़ (वार्ताहर)
एस़टी़विरोधात सावित्रीच्या लेकी
By admin | Updated: July 11, 2014 00:58 IST