शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील बचत गटांना घरघर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2017 00:25 IST

बचत गटांच्या सक्षमीकरणासाठी केंद्र व राज्य शासन विविध योजना राबवित असले तरी बँकेतील अधिकारी झारीतील शुक्राचार्य बनल्याने बचत गट अखेरचा श्वास घेत आहेत़ जिल्ह्यातील २६७ बचत गटांचे नवीन खाते उघडण्यासाठी बँका टाळाटाळ करीत असल्याने शासनाकडून प्राप्त झालेला १ कोटी ८० लाखांचा निधी मागील सहा महिन्यापासून पडून आहे़

भारत दाढेल।लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड: बचत गटांच्या सक्षमीकरणासाठी केंद्र व राज्य शासन विविध योजना राबवित असले तरी बँकेतील अधिकारी झारीतील शुक्राचार्य बनल्याने बचत गट अखेरचा श्वास घेत आहेत़ जिल्ह्यातील २६७ बचत गटांचे नवीन खाते उघडण्यासाठी बँका टाळाटाळ करीत असल्याने शासनाकडून प्राप्त झालेला १ कोटी ८० लाखांचा निधी मागील सहा महिन्यापासून पडून आहे़जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानातंर्गत स्वयंसहाय्यता महिला बचत गटांसाठी कर्ज उपलब्ध करून देण्यास बँका टाळाटाळ करत आहेत़ त्यामुळे दीड वर्षापासून बचत गटांचे कर्ज प्रकरणे प्रलंबीत आहेत़ तर दुसरीकडे नवीन बचत गटांचे खाते उघडण्यासाठी बँका तयार नाहीत़ बचत गटांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील गोरगरीब कुटुंबातील महिला स्वावलंबी होत असतानाच जिल्ह्यात बँकाच्या असहकार्यामुळे बचत गटांची चळवळ मोडकळीला आली आहे़बँकांच्या उदासीनधोरणामुळे केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनेतंर्गत मिळणारा निधी मिळणे अवघड झाले आहे़ त्यामुळे बचत गटांचा आर्थिक कणाच मोडल्याने हे महिला गट सध्या विखुरले आहेत़शासनाकडून नवीन बचत गटांसाठी बँकाच्या माध्यमातून निधी दिला जातो़ प्रत्येक गटाला ५० हजार ते १ लाखापर्यंतचा कर्ज पुरवठा केला जातो़ या वर्षीसाठी मंजूर झालेला १ कोटी ८० लाखाचा निधी सहा महिन्यापासून जाग्यावरच आहे़ बँकाकडून बचत गटांना खाते उघडण्यासाठी कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने २६७ गटांचे खाते प्रलंबीत आहेत़ त्यामुळे या गटांना निधी उपलब्ध करून देणे जिल्हा परिषदेच्या ग्रामीण विकास यंत्रणेला शक्य होत नाही़ यासंदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिनगारे यांनी वेळोवेळी बँक अधिकाºयांसोबत बैठका घेवून तसेच पत्रव्यवहार करून सहकार्य करण्या विषयी कळविले आहे़ परंतु बँकांचे अधिकारी कोणताचा प्रतिसाद देत नसल्याचे चित्र आहे़बँकेकडे प्रलंबित असलेल्या बचत गटांचे नवीन खाते उघडण्यासाठीचे प्रस्ताव पुढील प्रमाणे, बिलोली - ११, देगलूर - ७, हिमायतनगर - ३३, हदगाव - ३३, किनवट - ११, नांदेड - ३६, मुखेड- २६, मुदखेड- १० , भोकर - २५, धर्माबाद - १६, लोहा - ७, माहूर - २४, नायगाव - ९, उमरी - १५, कंधार - ४़