शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

सव्वा लाख शेतकरी कर्जमाफीच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2017 00:25 IST

नांदेड : जिल्ह्यातील जवळपास सव्वालाख शेतकरी कर्जमाफीच्या प्रतीक्षेत असून ५०० कोटींची कर्जमाफी जिल्ह्याला मिळणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत १ एप्रिल २०१२ आणि त्यानंतर घेतलेले पीक कर्ज व मध्यम मुदत कर्ज यापैकी ३० जून १६ अखेर थकबाकीदार असलेल्या शेतकºयांचे दीड लाख रुपयापर्यंतचे कर्ज पूर्णत: माफ करण्याचा निर्णय शासनाने घेतला.

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : जिल्ह्यातील जवळपास सव्वालाख शेतकरी कर्जमाफीच्या प्रतीक्षेत असून ५०० कोटींची कर्जमाफी जिल्ह्याला मिळणार आहे.छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत १ एप्रिल २०१२ आणि त्यानंतर घेतलेले पीक कर्ज व मध्यम मुदत कर्ज यापैकी ३० जून १६ अखेर थकबाकीदार असलेल्या शेतकºयांचे दीड लाख रुपयापर्यंतचे कर्ज पूर्णत: माफ करण्याचा निर्णय शासनाने घेतला. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, राष्ट्रीयीकृत बँक, खाजगी बँक व ग्रामीण बँकेकडून घेतलेल्या कर्जाचा या योजनेत समावेश करण्यात आला. कर्जमाफीची रक्कम लाभार्थी शेतकºयाच्या थेट कर्जखात्यात जमा होणार आहे. नांदेड जिल्ह्यात कर्जमाफीस जवळपास सव्वालाख शेतकरी पात्र ठरले आहेत. जिल्ह्यात दीड लाखापर्यंत थकित असलेले ४७ हजार २४७ शेतकरी आहेत. या शेतकºयांची २२० कोटी १४ लाखांची रक्कम होते तर दीड लाखांपेक्षा जास्त थकित कर्ज असलेले ३ हजार ३८२ शेतकरी आहेत. या शेतकºयांकडे १०४ कोटी ५४ लाखांची थकबाकी आहे. त्याचवेळी जिल्ह्यातील ५९ हजार ८४० शेतकºयांनी २०१६-१७ मध्ये नियमित पीक कर्जापोटी १३० कोटी ६४ लाख रुपये परत केले आहेत.जिल्ह्यात २०१६-१७ मध्ये नियमित आणि मध्यम/दीर्घ मुदतीकर्ज हप्ता परतफेड केलेले ६ हजार ९७० शेतकरी आहे. या शेतकºयांची ही रक्कम ४३ कोटी ८२ लाखांवर जाते.शेतकºयांना घोषित केलेल्या कर्जमाफी निर्णयाचा लाभ आतापर्यंत एकाही शेतकºयांना झाला नाही. शेतकरी कर्जमाफीचे अर्ज आता भरण्याचे फर्मान शासनाने काढले आहे. सध्या पीकविमा भरण्याची अंतिम तारीख ३१ जुलै आहे. त्यात तांत्रिक अडचणीमुळे पीकविमा भरण्यास मोठ्या रांगा लागत आहेत. शेतकरी पीक विमा भरण्यासाठी हवालदिल झाला आहे. या सर्व बाबींमुळे कर्जमाफीचा विषय सद्य:स्थितीत बाजूला गेला आहे. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेचा लाभ कधी मिळेल? याकडे जिल्ह्यातील शेतकºयांचे लक्ष लागले आहे.