औरंगाबाद : रविवारी सुटीच्या दिवशी ‘साईड बिझनेस’ म्हणून शहरात मंगळसूत्र चोऱ्या करणाऱ्या तरुणाला अटक करण्यात अखेर गुन्हे शाखा पोलिसांना यश आले. दोन बहिणींनी दाखविलेले धाडस आणि पोलिसांच्या तत्परतेमुळे हा चोरटा हाती लागला. संतोष प्रकाश आरते (२९, रा. विजयनगर, गारखेडा) असे आरोपीचे नाव आहे. त्याने आतापर्यंत शहरात पाच मंगळसूत्र आणि एक दुचाकी चोरीची कबुली दिली. कारवाईबाबत माहिती देताना गुन्हे शाखेचे सहायक आयुक्त खुशालचंद बाहेती यांनी सांगितले की, सिडको एन-४ येथील रहिवासी असलेल्या दोन बहिणी रविवारी सायंकाळी सेव्हन हिल परिसरात कामानिमित्त आल्या होत्या. सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास दोघी उड्डाणपुलाच्या बाजूने घराकडे पायी जात (पान २ वर)आरोपी संतोष आरते हा एन-३, कामगार चौकातील एका आॅप्टिकल्सच्या दुकानात फिटर म्हणून नोकरीला आहे. दर रविवारी त्याला सुटी असते. मौजमजेला पैसे लागतात म्हणून संतोषने मंगळसूत्र चोरीचा मार्ग स्वीकारला. त्यासाठी त्याने एक दुचाकी चोरी केली. ४रविवारी सुटी असली की तो दुचाकी घेऊन शहरात फिरायचा. संधी मिळताच मंगळसूत्र हिसकायचा. मग ते विकून आलेल्या पैशातून मौजमजा करायचा. असा त्याचा हा ‘उद्योग’ होता, असे सहायक आयुक्त खुशालचंद बाहेती यांनी सांगितले. पोलीस निरीक्षक अविनाश आघाव तपास करीत आहेत.
सुटीत मंगळसूत्र चोरीचा ‘साईड बिझनेस’
By admin | Updated: May 10, 2016 01:01 IST