औरंगाबाद : मराठवाडा पदवीधर मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसचे अधिकृत उमेदवार आ. सतीश चव्हाण शनिवारी (दि.३१) मिरवणुकीने जाऊन उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. गृहमंत्री आर.आर. पाटील यांच्या उपस्थितीत सकाळी १० वाजता क्रांतीचौकातून मिरवणुकीस सुरुवात होईल. दुपारी १ वाजता गोदावरी पब्लिक स्कूलमध्ये जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेला आर. आर. पाटील, माजी मुख्यमंत्री आ. शिवाजीराव निलंगेकर, खा. अशोकराव चव्हाण, डॉ. पद्मसिंह पाटील, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. माणिकराव ठाकरे, राजेश टोपे, राजेंद्र दर्डा, मधुकरराव चव्हाण, जयदत्त क्षीरसागर, जितेंद्र आव्हाड आदींची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
सतीश चव्हाण आज मिरवणुकीने अर्ज दाखल करणार
By admin | Updated: May 31, 2014 01:26 IST