शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

‘दिल्ली ते गल्ली’ खड्ड्यातच खरी कमाई; मग खड्डे बुजतीलच कसे...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2017 00:55 IST

दिल्ली ते गल्लीपर्यंत जागोजागी खड्डे पडले आहेत. कारण महानगरपालिका कुठलीही असो, तेथील अधिकारी व नगरसेवकांची खरी कमाई खड्ड्यातच आहे.

प्रशांत तेलवाडकर ।लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : दिल्ली ते गल्लीपर्यंत जागोजागी खड्डे पडले आहेत. कारण महानगरपालिका कुठलीही असो, तेथील अधिकारी व नगरसेवकांची खरी कमाई खड्ड्यातच आहे. जनतेची सेवा करणाºया नगरसेवकांना तर पगारही मिळत नाही. निवडणुकीत ओतलेला पैसा मग कुठून काढतील. मग, रस्त्यावर खड्डे पडले नाही तर त्या बिचाºयांची घरे कशी चालतील... जेवढे खड्डे अधिक तेवढी कमाई अधिक... यामुळे कितीही ओरड होवो, आंदोलन होवो, रस्त्यावर खड्डे पडणारच... असा मार्मिक टोला हिंदीतील हास्यकवी सुरेंद्र शर्मा यांनी लगावला.युवक बिरादरीतर्फे आयोजित एलोरा मिलन सोहळ्यानिमित्त सुरेंद्र शर्मा औरंगाबादेत मुक्कामी आले होते. त्यांनी लोकमतच्या प्रतिनिधीशी दीड तास दिलखुलास गप्पा मारल्या. देशातील सद्य:स्थितीचे धीरगंभीरपणे; पण मार्मिक विवेचन त्यांनी केले. ‘मी रचलेले विडंबनपर काव्य चुका करणाºयांना सावध करण्यासाठी असते, त्यांना जखमी करण्यासाठी नव्हे,’ असे म्हणत त्यांनी धर्माच्या नावावर चाललेल्या दुकानदारीच्या विषयाला हात घातला.धर्म को मानते है पर धर्म की नही मानतेकाही लोकांनी धर्माच्या नावावर दुकानदारी सुरू केलीय, या प्रश्नावर सुरेंद्र शर्मा म्हणाले, पहिले धर्माच्या नावावर उन्नती झाली... नंतर म्हटले गेले की, आम्ही धर्म वाढविणार, त्यानंतर धर्माच्या नावावरच पोळी भाजणे सुरू केले. आता तर धर्मालाच ओरबडणे सुरू केले आहे. आम्ही धर्म स्वीकारतो; पण त्या धर्माचे विचार प्रत्यक्षात अमलात आणत नाहीत. यातूनच भोंदूबाबा तयार झाले.दहशतवाद संपवा तरच शांतीदेशात गरीब व श्रीमंतांमधील दरी वाढत असल्याने समस्या निर्माण झाल्या आहेत. दहशतवाद, नक्षलवादीवृत्ती त्यातूनच वाढीस लागली आहे. दहशतवादी मारलेच पाहिजेत, तसेच दहशतवादच मिटविण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे; कारण देशात काही जणांकडे फेकून देण्याइतक्या पोळ्या आहेत, तर काही जणांना त्या पोळीचे दर्शन होत नाही, हा विरोधाभास संपविला तर अनेक समस्या कमी होतील.जीएसटी कसा गोळा करावा हे सरकारने मधमाशीकडून शिकावेमी काही अर्थतज्ज्ञ नाही, पण देशात फिरतो. लोक जे बोलतात त्यावरून जीएसटीमुळे सुविधा नाही तर अडचणी अधिक वाढल्या असे दिसते. कारण, व्यवसाय सोडून तांत्रिक समस्यांना जास्त तोंड द्यावे लागत आहे. चाणक्याने असे म्हटले होते की, मधमाशी फुलाची सुंदरता व सुगंध खराब न करता जसे मध सोशून घेते तसाच कर गोळा करावा. मी सुद्धा तेच म्हणतो की, सरकारनेही व्यापाºयांना कोणताही त्रास न होऊ देता जीएसटी गोळा करावा.दुसºयांच्या पत्नीवर काव्य केले तर लोक मारतीलतुम्ही नेहमी आपल्याच पत्नीवर व्यंगात्मक काव्य का करता, असे विचारता सुरेंद्र शर्मा म्हणाले की, दुसºयाच्या पत्नीवर काव्य केले, तर लोक मला कविसंमेलनातच स्टेजवर येऊन मारतील. त्यामुळे आपल्याच पत्नीवर काव्य करीत असतो; मात्र आता माझा माझ्या पत्नीतील इंटरेस्ट कमी झाला, पण तुम्ही एवढा इंटरेस्ट का दाखविता, असे म्हणत त्यांनी हास्य फुलविले.