शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

सातारा- देवळाईत आज मतदान

By admin | Updated: April 17, 2016 01:36 IST

औरंगाबाद : सातारा- देवळाई परिसरातील दोन वॉर्डांमध्ये आज मतदान घेण्यात येत आहे. दोन नगरसेवक निवडून आणण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे.

औरंगाबाद : सातारा- देवळाई परिसरातील दोन वॉर्डांमध्ये आज मतदान घेण्यात येत आहे. दोन नगरसेवक निवडून आणण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे. भौगोलिकदृष्ट्या दोन्ही वॉर्ड खूप मोठे असल्याने उमेदवारांना बराच घाम गाळावा लागला. पाऱ्याने चाळिशी पार केल्याने किती मतदार मतदान केंद्रापर्यंत येतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.रविवारी सकाळी ७ वाजता मतदानाला सुरुवात होणार असून, वॉर्ड क्रमांक ११४ मध्ये चौरंगी लढत आहे. वॉर्ड क्रमांक ११५ मध्ये तिरंगी लढत होणार आहे. दोन्ही वॉर्डात ११ उमेदवार आपले नशीब अजमावत आहेत. वॉर्ड क्रमांक ११४ मध्ये शिवसेना, काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, अशी लढत होणार असल्याने मतदारांचा कौल कोणत्या बाजूने जाईल यावर वेगवेगळे अंदाज बांधले जात आहेत. चार अपक्षही कंबर कसून निवडणूक मैदानात उतरले आहेत. वॉर्ड क्रमांक ११५ मध्ये शिवसेना, काँग्रेस, भाजप असा बहुरंगी सामना आहे. या वॉर्डातील महिला उमेदवारांनी जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला आहे. या वॉर्डात सुशिक्षित मतदार मोठ्या संख्येने आहेत. रविवारी सुट्टी आहे. पारा चाळिशी पार गेला असल्याने मतदार किती मतदान केंद्रापर्यंत येतात यावर बरीच समीकरणे अवलंबून आहेत.वॉर्ड क्रमांक ११४ मधील काँग्रेसचे उमेदवार राजूकाका नरवडे, शिवसेनेचे उमेदवार हरिभाऊ हिवाळे, भाजपचे उमेदवार अप्पासाहेब हिवाळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार नामदेव बाजड, चार अपक्ष उमेदवारांनी बरीच मेहनत घेतली आहे. वॉर्ड क्रमांक ११५ सातारा येथील शिवसेनेच्या उमेदवार पल्लवी गायकवाड, काँग्रेसच्या उमेदवार सायली जमादार, भाजपच्या उमेदवार सुरेखा बावस्कर यांनी प्रचारावर चांगलाच भर दिला होता.