शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

सातारा- देवळाई परिसरातील मोबाईल टॉवर व मोकळ्या जागांचा शोध सुरू

By admin | Updated: May 10, 2016 00:56 IST

औरंगाबाद : सातारा- देवळाई ग्रामपंचायत व नगर परिषदेच्या काळात लावण्यात आलेला टॅक्स पुढे रेग्युलराईज केला की नाही आणि दोन्ही वॉर्डातील

औरंगाबाद : सातारा- देवळाई ग्रामपंचायत व नगर परिषदेच्या काळात लावण्यात आलेला टॅक्स पुढे रेग्युलराईज केला की नाही आणि दोन्ही वॉर्डातील रिकामे भूखंड व उद्यानाचा शोध सुरू करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. पाणी, रस्ते, ड्रेनेज, पथदिवे इत्यादी प्रमुख समस्यांसह उद्यान, खेळाचे मैदान, तसेच कोणत्या भूखंडावर अतिक्रमण झालेले आहे, त्याची माहिती काढण्याचे काम मनपाच्या वतीने सुरू केले आहे. वॉर्डात सोयी-सुविधा देण्यासाठी आता अधिकृत मनपा प्रयत्न करीत आहे. सध्या नागरिकांना पाणीपुरवठा टँकर व ड्रमच्या मापात केला जात असून, मुबलक पाणीपुरवठ्याचे स्वप्न अद्यापही पूर्ण झालेले नाही. ग्रामपंचायत व नगर परिषदेच्या काळात ज्या स्थावर मालमत्ता होत्या त्या सर्व मनपात वर्ग झाल्या असे म्हटले जाते. परंतु दोन्ही वॉर्डात किती उद्याने आहेत. सध्या ग्रामपंचायतीच्या काळातील टॅक्स अदा केला जात आहे. नव्याने बैठका घेऊन सेवा-सुविधा पुरविल्यावर कर आकारण्यात येणार आहे; परंतु आताच्या दोन्ही वॉर्डात असलेल्या मोबाईल टॉवरवर पूर्वी नगर परिषदेने दंडात्मक कारवाई केली होती. त्यांनी ते टॉवर रेग्युलराईज केले आहेत का, याचा शोधही मनपाचे अधिकारी घेत आहेत. पाऊणलाख लोकसंख्या असलेल्या परिसरात आबालवृद्धांना मोकळ्या हवेत फिरण्यासाठी व मुलांना खेळण्यासाठी मैदानच शिल्लक दिसत नाही. छत्रपती क्रीडा संकुल सोडले तर इतर उद्याने आहेत कुठे, असा प्रश्न अधिकारी व कर्मचाऱ्यांना पडलेला आहे.