लोकमत न्यूज नेटवर्कवाळूज महानगर : पंढरपूर ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी शेख अख्तर यांची मंगळवारी (दि.८) बिनविरोध निवड झाली. यासाठी बोलावलेल्या विशेष सभेला १३ सदस्यांनी हजेरी, तर विरोधी गटाच्या ३ सदस्यांनी दांडी मारली.जिल्हा परिषदेच्या निवडणुकीनंतर गटात तयार झालेल्या नवीन राजकीय सत्ता समीकरणामुळे तत्कालीन सरपंच गौतम चोपडा यांनी पदाचा राजीनामा दिलाहोता.सरपंचपदाच्या निवडीसाठी विशेष सभेची तारीख जाहीर होताच ग्रामपंचायत सदस्य शेख अख्तर यांनी बहुमताचा जादुई आकडा गाठण्यासाठी ११ सदस्यांना सोबत घेऊन अज्ञातस्थळी सहलीसाठी रवाना झाले होते.मंगळवारी सकाळी शेख अख्तर व उपसरपंच महेंद्र खोतकर यांनी दोन नामांकन अर्ज नेले. निर्धारित मुदतीत शेख अख्तर यांचा एकमेव अर्ज आल्यानंतर दुपारी २ वा. शेख अख्तर यांची सरपंचपदी बिनविरोध निवड झाल्याचे अध्यासी अधिकारी आर. पी. बागडे यांनी जाहीर केले. यावेळी सहायक निवडणूक अधिकारी म्हणून तलाठी निकम व ग्रामविकास अधिकारी एस. बी. शेवंते यांनी काम पाहिले.सरपंचपदाच्या निवडणुकीत उपसरपंच महेंद्र खोतकर, नूरजहॉबी शहा, अंजिराबेगम शेख इस्माईल, सुमन खोतकर, पूजा उबाळे, मीराबाई गिºहे, तस्लिमा अक्रम शेख, शेख अख्तर, महेबुब चौधरी, अनिल कोतकर, शेख गुलाब, संगीता गायकवाड या १३ सदस्यांची सभेला उपस्थिती होती. विरोधी गटाचे अप्पासाहेब पा.साळे, लताबाई कानडे व बाळासाहेब राऊत गैरहजरहोते.
शेख अख्तर पंढरपूरचे सरपंच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2017 00:31 IST