शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

गंगापूर तालुक्यात सर्रास वृक्षतोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2018 00:28 IST

गंगापूर तालुक्यात बेकायदेशीर वृक्षतोड मोठ्या प्रमाणात होत असून याकडे वन विभागाकडून जाणूनबुजून कानडोळा केला जात आहे. गंगापूर, लासूर स्टेशन, वाळूज परिसरातील आरा मशीन (वखार) मध्ये लाकडांचे ढीग दिसून येत आहेत. वनसंपदा नष्ट होत असल्याने निसर्गप्रेमींनी नाराजी व्यक्त केली.

लोकमत न्यूज नेटवर्कगंगापूर : गंगापूर तालुक्यात बेकायदेशीर वृक्षतोड मोठ्या प्रमाणात होत असून याकडे वन विभागाकडून जाणूनबुजून कानडोळा केला जात आहे. गंगापूर, लासूर स्टेशन, वाळूज परिसरातील आरा मशीन (वखार) मध्ये लाकडांचे ढीग दिसून येत आहेत. वनसंपदा नष्ट होत असल्याने निसर्गप्रेमींनी नाराजी व्यक्तकेली.गंगापूर तालुक्यात शिवना, नारळी, गोदावरी, खाम नदी काठावरील घोडेगाव, पळसगाव, शेंदुरवादा, कनकोरी, कोळघर, लासूर स्टेशन, नेवरगाव, हैबतपूर, बगडी, कानडगाव, धनगरपट्टी या गावातून मोठ्या प्रमाणात वृक्षतोड केली जात आहे. तालुक्यात होत असलेली वृक्षतोड वनविभागाच्या नजरेआड नाही.अधिकारी व कर्मचारी या परिसरातील वृक्षतोड करणाºयांशी संपर्क साधून आहेत. त्यामुळे जंगलतोड करणारे शेतातील, माळरानावरील, शेताच्या बांधावरील व नदी काठावरील अतिजुनाट वृक्षे बेकायदेशीर तोडून आपले चांगभले करुण घेत आहेत.गंगापूर तालुक्यात ४० ते ५० वर्षांपूर्वीच्या झाडांची तोड केली जात असल्याचे दिसत आहे. लिंब, चिंच, उंबर, वड, पिंपळ, बेल ही झाडे तोडण्यास शासनाकडून बंदी केली आहे. तरी देखील या झाडांची सर्रास कत्तल होत आहे. ही झाडे तोडण्यासाठी परवानगी घ्यावी लागते. मात्र वनविभाग व वृक्षतोड करणाºयांमध्ये आर्थिक हितसंबंध जोपासले जात असल्याने कुणावरही कारवाई होताना दिसत नाही.पशुपक्षी हे सैरभैरपर्यावरणाचा समतोल राहण्यासाठी या वृक्षांचे मोठे महत्व आहे. वृक्षतोडीमुळे पशुपक्षांना देखील वास्तव्य करण्याची गैरसोय होऊ लागली आहे. त्यामुळे पशुपक्षी हे सैरभैर झाले आहेत. वृक्षतोडीची वरिष्ठ पातळीवरून चौकशी करुन वृक्षतोडीला आळा घालवा, अशी मागणी पर्यावरणप्रेमींकडून होत आहे.