शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

अंत्यसंस्कारासाठी सरण महागले, लगद्याच्या विटांचा करणार वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:04 IST

औरंगाबाद : कोरोना, नैसर्गिक मृत्यूमुळे स्मशानभूमीमध्ये मागील महिनाभरापासून अंत्यसंस्कारासाठी अक्षरश: रांगा लागत आहेत. त्यातच सरणही महागले आहे. अंत्यसंस्कारासाठी लाकडाचा ...

औरंगाबाद : कोरोना, नैसर्गिक मृत्यूमुळे स्मशानभूमीमध्ये मागील महिनाभरापासून अंत्यसंस्कारासाठी अक्षरश: रांगा लागत आहेत. त्यातच सरणही महागले आहे. अंत्यसंस्कारासाठी लाकडाचा वापर थांबवून लगद्यापासून तयार होणाऱ्या विटांचा (ब्रिक्वेटस्‌) वापर करण्याचा निर्णय मनपा प्रशासनाने घेतला आहे. त्याकरिता लवकरच निविदा काढली जाणार आहे.

अंत्यसंस्कारासाठी लाकडांचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. महापालिकेने तीन दशकांपूर्वी शहरात विद्युत दाहिनीचा प्रयोग केला होता. मात्र, तो यशस्वी झाला नाही. त्यामुळे आजही शहरातील विविध स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कारासाठी शंभर टक्के लाकडांचाच वापर करण्यात येतो. झाडांची कत्तल करून लाकडे आणली जात असल्यामुळे पर्यावरण धोक्यात येत आहे. प्रदूषण वाढत असल्याने चिंता व्यक्त होत आहे. मनपा प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांनी लाकडाचा वापर थांबविण्याच्या दृष्टीने पर्यायी व्यवस्था म्हणून लगद्यापासून तयार विटांचा वापर अंत्यसंस्कारासाठी करण्याचा निर्णय घेतला आहे. शहरात १६ स्मशानभूमींमध्ये मृतदेहावर अंत्यसंस्कार केले जात असून, त्याकरिता लाकडांचा वापर होत आहे. सध्या कोरोनामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण वाढले आहे. बाहेरच्या जिल्ह्यातील व बाहेरच्या गावातील कोरोना रुग्णांचा मृत्यू झाल्यानंतरही त्याच्यावर शहरातील स्मशानभूमीतच अंत्यसंस्कार केले जात असल्याने लाकडांचा वापर वाढलेला आहे. लाकडांचा वापर पूर्णपणे थांबविण्यासाठी लगद्यापासून किंवा ऊस, सोयाबीन यापासून तयार होणाऱ्या विटांचा (ब्रिक्वेटस्‌) वापर केला जाणार आहे. त्याकरिता मनपाने निविदा काढण्याची तयारी सुरू केली आहे, असे शहर अभियंता सखाराम पानझडे यांनी सांगितले.