शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

श्रमिक तास कमी केल्याच्या विरोधात एसटी कामगारांची निदर्शने 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2017 18:37 IST

एसटी महामंडळाने श्रमिक तास कमी केल्याच्या निषेधार्थ चिकलठाणा मध्यवर्ती कार्यशाळेतील कामगारांनी  दुपारी १२.३० वाजता कार्यशाळेसमोर निदर्शने केली.

ठळक मुद्देसल्लागार समितीच्या अहवालानुसार २०० श्रमिक तास कमी करण्याची शिफारस करण्यात आली आहे.या निर्णयाविरोधात विविध संघटनांची संयुक्त कृती समिती स्थापन करून कामगारांनी आंदोलनाचा निर्णय घेतला.

ऑनलाईन लोकमत 

औरंगाबाद, दि. ३० : एसटी महामंडळाने श्रमिक तास कमी केल्याच्या निषेधार्थ चिकलठाणा मध्यवर्ती कार्यशाळेतील कामगारांनी  दुपारी १२.३० वाजता कार्यशाळेसमोर निदर्शने केली. यावेळी कामगारांनी महामंडळाच्या परिपत्रकाची होळी करत जोरदार घोषणाबाजी केली. 

एसटी महामंडळाच्या राज्यभरात दापोडी, औरंगाबाद आणि नागपूर येथे मध्यवर्ती कार्यशाळा आहेत. या तिन्ही ठिकाणी बस बांधणी केली जाते. या कार्यशाळांमधील कामाचा (टाइम व मोशन) अभ्यास करण्यासाठी तज्ज्ञ  सल्लागारांची नियुक्ती करण्यात आली होती. या सल्लागार समितीच्या अहवालानुसार श्रमिक तास निश्चित करण्यात आले. यामध्ये २०० श्रमिक तास कमी करण्याची शिफारस करण्यात आली आहे. या श्रमिक तासांची अंमलबजावणी करण्याचे आदेश मध्यवर्ती कार्यशाळेच्या व्यवस्थापकांना देण्यात आले आहेत.

या निर्णयाला कामगारांनी विरोध दर्शविला आहे. श्रमिक तास कमी झाल्याने कमी वेळात अधिक काम करावे लागणार आहे. यामुळे या निर्णयाविरोधात विविध संघटनांची संयुक्त कृती समिती स्थापन करून कामगारांनी आंदोलनाचा निर्णय घेतला. या आंदोलनात महामंडळाच्या परिपत्रकाची होळी करीत कामगारांनी संतप्त भावना व्यक्त केल्या. यावेळी परिवहन मंत्र्यांच्या विरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्या.