शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
2
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
3
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
4
COVID19: महाराष्ट्रावरचं कोरोना संकट आणखी गडद, आज १२ नव्या रुणांची नोंद, २४ तासात एकाचा मृत्यू
5
उद्धव-राज ठाकरेंसंदर्भात रामदास आठवले यांची मोठी भाविष्यवाणी, म्हणाले, 'आमच्या महायुतीला...!'
6
जयजयकार...मराठी शक्तीचा, 'ठाकरे ब्रँड'वरील भक्तीचा! उद्धव-राज एकत्र येतात तेव्हा...
7
आशा आहे, मी आणखी 30-40 वर्षे जगेन आणि...; दलाई लामांकडून उत्तराधिकारी वादाला पूर्णविराम
8
"डोळे आणि मन आज तृप्त झालं...", ठाकरे बंधू एकत्र, मराठी अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
9
"हिंदी सक्ती मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याआधीची चाचपणी होती"; राज ठाकरे यांचा गंभीर आरोप
10
Navi Mumbai: पत्नीसह सासूलाही कपडे काढायला लावले अन्...; काळ्या जादूच्या नावाखाली जावयाने सर्व मर्यादा ओलांडल्या!
11
ही तरुणी बनणार मंगळावर पाय ठेवणारी पहिली व्यक्ती, कोण आहे एलिसा कार्सन, म्हणते सुखरूप परतले तर...
12
'डियर क्रिकेट... डोन्ट गिव्ह वन मोअर चान्स' असं म्हणायची वेळ! करुण नायर चौथ्या प्रयत्नातही 'नापास'
13
Devendra Fadnavis on Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava : राज ठाकरेंचे आभार, बाळासाहेबांचे आशीर्वाद आज मलाच मिळत असतील- देवेंद्र फडणवीस
14
Sushil Kedia Office Vandalise: सुशील केडिया यांच्या मुंबईतील कार्यालयाची तोडफोड, मनसेच्या ५ कार्यकर्त्यांना अटक
15
Himachal Flood : पावसाचे थैमान! ७२ जणांचा मृत्यू, ३७ बेपत्ता; हिमाचलमध्ये ढगफुटीमुळे नुकसान, रेड अलर्ट जारी
16
PNB घोटाळ्यातील फरार आरोपी नीरव मोदीचा भाऊ नेहल मोदी अटकेत, अमेरिकेत मुसक्या आवळल्या
17
Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava Marathi : "अडवाणी ख्रिश्चन मिशनरी स्कूलमध्ये शिकले, त्यांच्या हिंदुत्वावर शंका घेऊ का?"; राज ठाकरेंनी यादीच वाचली...
18
धक्कादायक! दुधात थुंकायचा आणि तेच लोकांना द्यायचा; किळसवाणा प्रकार CCTV मध्ये कैद
19
इंग्लंडनं २४ चेंडूत गमावल्या ९ विकेट्स! टीम इंडियानं अखेरच्या षटकात हातात आलेली मॅच घालवली
20
Post Office ची जबरदस्त स्कीम, केवळ व्याजातूनच होईल ₹८२,००० ची कमाई; एकरकमी गुंतवणूक करावी लागणार

साजापुरात बिबट्या

By admin | Updated: December 4, 2014 00:56 IST

वाळूज महानगर : साजापूर परिसरात आज पहाटे वीटभट्टीवरील मजुरांना बिबट्याने दर्शन दिल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

वाळूज महानगर : साजापूर परिसरात आज पहाटे वीटभट्टीवरील मजुरांना बिबट्याने दर्शन दिल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. या प्रकारामुळे घाबरलेल्या नागरिकांनी वन विभागाकडे धाव घेऊन या बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे.साजापूर शिवारातील गट नंबर ६५ मध्ये शेख हुसैन शेख रहीम यांची वीटभट्टी आहे. २ डिसेंबरला रात्री मजूर विटा थापण्याचे काम करीत होते. पहाटे २.३० ते ३ वाजेच्या सुमारास जोरजोरात कुत्र्यांच्या भुंकण्याचा आवाज ऐकू येऊ लागल्यामुळे बबन खंडागळे याने तिकडे पाहिले असता त्यास अंधारात एका प्राण्याचे डोळे चमकत असल्याचे दिसून आले. घाबरलेल्या बबनने बॅटरीच्या प्रकाशात बघितले असता हा प्राणी त्याच्याकडे येत असल्याचे दिसून आले. बबनने धूम ठोकून याची माहिती मजुरांना दिली. भगवान पवार, राजू गायकवाड व अन्य ८ ते १० मजूर जमा झाले असता त्यांना एक बिबट्या व त्याचा बछडा खेळत वीटभट्टीजवळच्या मातीच्या ढिगाऱ्याकडे येताना दिसले. माती व पोयट्याच्या ढिगाऱ्यावर बिबट्या व बछडा तब्बल अर्धा तास बागडत होते. मजुरांनी ही माहिती वीटभट्टीमालक शेख हुसैन यांना मोबाईलवर दिली. घाबरलेल्या मजुरांनी रात्र जागूनच काढली. या प्रकाराची माहिती मिळताच आज सकाळी उपसरपंच सय्यद कलीम, पोलीस पाटील रशीद पठाण, शेख नईम, शेख हुसैन आदींनी पाहणी केली. यावेळी वीटभट्टीवरील माती व पोयट्याच्या ढिगाऱ्यावर बिबट्याचे ठसे त्यांना दिसून आले. उपसरपंच सय्यद कलीम यांनी दौलताबाद वन विभागाच्या अधिकाऱ्यांना पत्र देऊन पाहणी करण्याचे सांगितले. मात्र सायंकाळपर्यंत वन विभागाचे कर्मचारी घटनास्थळाकडे फिरकले नसल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे.