शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

सांज भई बंदिशीने रंगली संगीत सभा

By admin | Updated: August 10, 2014 02:02 IST

औरंगाबाद : संगीत रसिकांनी राग पुरिया धनश्रीमधील विशाल कशाळकरांची बंदिश सांज भईची सुरम्य संध्याकाळ अनुभवली.

औरंगाबाद : सरस्वती भुवन शिक्षण संस्थेच्या शताब्दी महोत्सवानिमित्त संगीत रसिकांनी राग पुरिया धनश्रीमधील विशाल कशाळकरांची बंदिश सांज भईची सुरम्य संध्याकाळ अनुभवली. शनिवारी सायंकाळी ६ ते ८ दरम्यान गोविंदभाई श्रॉफ ललित अकादमीच्या संगीत सभागृहात द्वितीय संगीत सभा उत्साहात पार पडली.या सभेत जयपूर- ग्वाल्हेर- किराणा घराण्याच्या गायिका व अभिजात संगीत या पुस्तकाच्या लेखिका अंजली मालकर यांनी गीते सादर केली. आपल्या गायनाची सुरुवात त्यांनी ‘पुरिया धनश्री’ रागातील ‘सांज भई ना आए पिहरवा’ या विलंबित तीन तालातील रचनेने केली. यानंतर त्यांनी ‘आ जरा दिन डुबा’ ही रचना सादर केली. यानंतर भूप रागमधील झपतालातील गुरूपद वंदन ही पं. कुमुदिनी काट्टारे यांची रचना सादर केली. अध्धातीन तालातील सुखनिधान श्रीराम या रचनेनंतर ‘गौड मल्हार’ रागातील पावसाळ्यातील प्रियकर आपल्या प्रेयसीला मनवण्याचा प्रयत्न करणारी ‘मानन करिए’ ही रचना त्यांनी उत्साहात सादर केली.या सभेत पुढे तारिणी नववसन धारिणी हे नाट्यगीतही त्यांनी सादर केले. या संगीत सभेचा समारोप संत नामदेवांच्या राग भैरवीतील अंभगाने झाला. अंजली मालकर यांना संवादिनीवर गजानन केचे, तबला मंगेश कुलकर्णी, तानपुरा आश्विनी ठाणगे, धनश्री जोशी यांनी साथ संगत केली.परिसरात शास्त्रीय संगीताचा प्रचार- प्रसार व्हावा या उद्देशाने मोठ्या उत्साहात सुरू केलेल्या या शताब्दी महोत्सवातील दुसऱ्या संगीत पुष्पाचे उद्घाटन संस्थाध्यक्ष दिनकर बोरीकर यांच्या हस्ते झाले. यावेळी कोषाध्यक्ष रामकृष्ण जोशी, सहचिटणीस डॉ. श्रीरंग देशपांडे व ज्ञानप्रकाश मोदाणी, स्थानिक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष डॉ. सुधीर रसाळ, प्राचार्य डॉ. जे. एस. खैरनार आदींची उपस्थिती होती. यावेळी सहभागी कलाकारांचा सत्कार संस्था सभासद प्रा. दिनकर कोरान्ने यांनी केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वंदना रसाळ यांनी केले, तर उपप्राचार्य श्रीकांत मुळे यांनी आभार मानले. या संगीत सभेस गायिका पं. शुभदा पराडकर, प्रा. शिवराम गोसावी, डॉ. दिलीप घारे, श्रीकांत तांबे, हरिष देशमुख, कल्याण अपार, मंगला कुलकर्णी यांच्यासह संगीत क्षेत्रातील मान्यवर रसिक श्रोत्यांनी हजेरी लावली.