शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

लोकमत महामॅरेथॉनच्या मार्गावर स्वच्छता अभियान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2017 00:31 IST

लोकमत महामॅरेथॉनच्या मार्गावर सीआरटीच्या वतीने स्वच्छता अभियान राबविण्यात आले. पाण्याच्या बाटल्या, कागद आदी १२७४ किलो कोरडा कचरा जमा करण्यात आला. यातून ‘माझे शहर स्वच्छ शहर’ हा संदेश देण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : लोकमत महामॅरेथॉनच्या मार्गावर सीआरटीच्या वतीने स्वच्छता अभियान राबविण्यात आले. पाण्याच्या बाटल्या, कागद आदी १२७४ किलो कोरडा कचरा जमा करण्यात आला. यातून ‘माझे शहर स्वच्छ शहर’ हा संदेश देण्यात आला.लोकमत महामॅरेथॉनला रविवारी प्रचंड प्रतिसाद मिळाला. धावपटूंसाठी जागोजागी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. धावपटू पाणी पिऊन प्लास्टिकच्या बाटल्या डस्बिनमध्ये किंवा प्लास्टिकच्या पोत्यात टाकून पुढे जात होते. हा कचरा उचलून त्याची योग्य विल्हेवाट लावण्याचे काम सीआरटीचे १७ सदस्य व काबरा कॉलेजच्या १०० विद्यार्थ्यांनी केले. संपूर्ण महामॅरेथॉन मार्गावर जागोजागी पहाटे ३.३० ते सकाळी ११.३० पर्यंत स्वयंसेवक उभे होते. खाली झालेल्या प्लास्टिकच्या बाटल्या, ज्यूस बॉक्स जमा केले जात होते. सुका कचरा भरण्यासाठी पांढºया रंगाचे प्लास्टिकचे पोते आणण्यात आले होते. कचरा जमा करण्याचे काम नियोजनबद्ध व शिस्तबद्ध पद्धतीने राबविले जात होते. महामॅरेथॉन संपल्यानंतर मार्गावर एकही प्लास्टिक बाटली, ज्यूस बॉक्स आढळून आले नाही. बाटल्यांमध्ये राहिलेले पाणी स्वयंसेवक रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडांना टाकीत होते. एवढी काळजी घेण्यात येत होती. यात १२७४ किलो कोरडा कचरा जमा झाला. यासाठी विविध मार्गांवर ३७ गाड्यांचा वापर करण्यात आला. कोरडा कचरा रिसायकलिंगसाठी कॅनपॅक ड्राय वेस्ट शॉर्टिंग सेंटर येथे देण्यात येणार आहे. सीआरटीतर्फे शहरात ‘बजाज माझी सिटी स्वच्छ सिटी’ अभियान राबविण्यात येत आहे. सीआरटीच्या व्यवस्थापकीय संचालिका निताशा जहरीन व गौरी मिराशी यांच्या नेतृत्वाखाली स्वयंसेवकांनी स्वच्छता अभियान यशस्वी केले.