शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

रेतीची चोरटी वाहतूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2017 00:15 IST

तालुक्यातील सोळा अधिकृत रेती घाटांसह महसूल विभागाकडे नोंद नसलेल्या अनेक रेती घाटांतून महसूल विभागाची नजर चुकवून राजरोसपणे रेतीचा अवैध उपसा सुरु आहे. पैनगंगा नदीपात्रातून रेतीचा उपसा करुन नदीकाठावर ढीग करुन शेकडो ब्रास रेतीची चोरटी वाहतूक केली जात असल्याचे दिसून येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्ककिनवट : तालुक्यातील सोळा अधिकृत रेती घाटांसह महसूल विभागाकडे नोंद नसलेल्या अनेक रेती घाटांतून महसूल विभागाची नजर चुकवून राजरोसपणे रेतीचा अवैध उपसा सुरु आहे. पैनगंगा नदीपात्रातून रेतीचा उपसा करुन नदीकाठावर ढीग करुन शेकडो ब्रास रेतीची चोरटी वाहतूक केली जात असल्याचे दिसून येत आहे.रेतीची अवैध वाहतूक रोखण्याचे अधिकार महसूल कर्मचाºयांना आहेत. मात्र संबंधितांकडून रेती तस्करांकडे कानाडोळा केला जात असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. या पार्श्वभूमीवर उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांनी लक्ष घालून रेतीच्या वाहतुकीवर आळा घालावा, अशी मागणी होत आहे.शहर व परिसरात तसेच तालुक्यात काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात बांधकामे सुरु आहेत. या बांधकामांना रेतीची आवश्यकता असते.रेती तस्कर रॉयल्टी न भरताच चोरुन आणलेली रेती गरजू बांधकाम करणाºयांना अव्वाच्या सव्वा दराने विक्री केली जात असल्याच्याही तक्रारी वाढल्या आहेत.जिल्हा प्रशासनाने तत्काळ रेती घाटाचा लिलाव करुन तत्पूर्वी पथके नेमून रेती तस्करीवर आळा घालण्याची आवश्यकताही व्यक्त होत आहे. पैनगंगा नदीसह तालुक्यातील छोट्या मोठ्या नाल्यांतून रेतीच्या अवैध उपशाकडे प्रभारी उपविभागीय अधिकारी तथा तहसीलदार नरेंद्र देशमुख यांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला असता उपशाविरुद्ध तात्काळ कारवाई करण्यात येईल, असे सांगितले. रेतीचा बेसुमार उपसा राजरोसपणे सुरु असला तरी महसूल विभाग याकडे दुर्लक्ष करीत असल्याने रेती तस्कर मालामाल होत आहेत.रात्रंदिवस रेतीचा उपसा करुन ट्रॅक्टरद्वारे त्याची वाहतूक होताना दिसत आहे. जून महिन्यात उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव चौधरी यांनी रेतीचे ट्रॅक्टर जप्त केले होते.जे काम महसूल विभागाच्या पथकाने करावयास हवे ते काम पोलिसांनी करुन महसूल विभागाला चपराक लगावली आहे. गोकुंद्यानजीक पाटबंधारे वसाहतीच्या पाठीमागे असलेल्या स्मशानभूमीलगत पैनगंगा नदीतून हा उपसा बिनदिक्कत सुरु आहे.