शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

संदीप क्षीरसागरांचा कल राष्ट्रवादीकडेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2017 00:41 IST

बीड जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत तीनच पण निर्णायक संख्याबळ पटकावलेल्या काकू- नाना आघाडीचा टेकू राष्ट्रवादी काँग्रेसलाच मिळेल हे आता स्पष्ट होऊ लागले आहे.

प्रताप नलावडे बीडजिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत तीनच पण निर्णायक संख्याबळ पटकावलेल्या काकू- नाना आघाडीचा टेकू राष्ट्रवादी काँग्रेसलाच मिळेल हे आता स्पष्ट होऊ लागले आहे. आघाडीचे प्रमुख संदीप क्षीरसागर यांनी घड्याळासह स्वत:ची छायाचित्रे सोशल मीडियावर पोस्ट करुन याला पुष्टीच दिली आहे. उल्लेखनीय म्हणजे ‘स्वत:चा रस्ता स्वत:च तयार करा...’ असा सूचक संदेश लिहून त्यांनी बारामतीचा ‘राजमार्ग’ स्वत:साठी सुरक्षित केला आहे. त्यामुळे काका आ. जयदत्त क्षीरसागर यांच्यावर कुरघोडी करतानाच त्यांनी भाजपलाही धोक्याचा इशारा दिला आहे.राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांच्याशी मतभेद झाल्यानंतर पुतणे संदीप क्षीरसागर यांनी ‘काकू - नाना आघाडी’ची मुहूर्तमेढ रोवून स्वतंत्र चूल मांडली. पालिका निवडणुकीतही संदीप क्षीरसागर यांनी दोन्ही काकांची पुरती कोंडी केली. जि.प., पं. स. निवडणुकीतही त्यांनी आघाडीचा ‘फॉर्म्यूला’ कायम ठेवला. आ. जयदत्त क्षीरसागर व डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांनी प्रतिष्ठा पणाला लावूनही राकॉला तालुक्यात केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले. दुसरीकडे संदीप यांनी स्वत:सह मातोश्री सुरेखा क्षीरसागर व केशरबाई घुमरे अशा तीन जागा जिंकून ग्रामीण भागातही पकड घट्ट केली. सर्वाधिक २५ जागा पटकावून राष्ट्रवादी क्रमांक १ चा पक्ष ठरला. मात्र, काँग्रेसचे तीन सदस्य सोबत आले तरीही सत्तास्थापनेकरता राकॉला तीन जागा कमीच पडतात. आ. विनायक मेटे यांच्याकडे चार सदस्य आहेत; पण ते भाजपच्या कोट्यातून विधानपरिषदेवर पोहोचले आहेत. शिवसेनेत दाखल झालेले माजीमंत्री बदामराव पंडित यांनीही चार जागा पटकावल्या. मात्र, हे दोन्ही नेते जि.प. मध्ये राकॉला रसद पुरविण्याची शक्यता कमीच आहे. राकॉशी बंड केलेल्या संदीप क्षीरसागरांकडे निर्णायक संख्याबळ आहे. त्यांनी अद्याप आपली भूमिका स्पष्ट केली नाही; पण महाशिवारात्रीनिमित्त शुभेच्छा देताना सोशल मीडियावर त्यांनी स्वत:च्या छायाचित्रासोबत राकॉचे निवडणूक चिन्ह असलेल्या घड्याळाचेही दर्शन घडविले आहे. त्यानंतर दोन दिवसांपासून त्यांची आणखी एक ‘पोस्ट’ झळकत आहे. ‘रस्ता सापडत नसेल तर... स्वत:चा रस्ता स्वत:च तयार करा..’ असा त्यात सूचक संदेश आहे. हा संदेश आगामी रणनीतीविषयी बरेच काही सांगून जातो.आ. क्षीरसागर यांच्यावर जि.प. निवडणुकीत मात केल्यानंतर संदीप क्षीरसागर यांची आगामी रणनीती काय ? याबाबत तर्कवितर्क आहेत. मात्र, स्वबळाची ताकद दाखविल्यानंतर त्यांनी स्वत:च्या छायाचित्रांसोबत घड्याळ कायम ठेवून आश्चर्याचा धक्का दिला आहे. त्यामुळे राकॉतील दुहीचा फायदा उठवू पाहणाऱ्या भाजपसाठीही संदीप क्षीरसागरांचा हा नवा डाव धोक्याची ‘टिकटिक’ ठरत आहे.