परतूर : दुधना नदीच्या पात्रातून अवैध वाळू उपसा करणारे तीन ट्रॅक्टर पकडले. ही कारवाई महसूल व पोलिसांनी संयुक्तपणे केली.या कारवाईमुळे वाळू माफियांत खळबळ उडाली आहे. तालुक्यातील दुधना नदीच्या नांद्रा घाटातून अवैध वाळू उपसा मोठ््या प्रमाणात वाढला होता. याची दखल घेत तहसीलदार विनोद गुंडमवार यांनी स्वत: महसूलचे व पोलिस पथक घेऊन दुधना नदीच्या पात्रात दि. २८ रोजी दुपारी २.२५ च्या दरम्यान जाऊन वाळू भरून नेणारे ट्रॅक्टर क्र एम. एच. २१-१०७१, एम. एच. २१- ९९१८, एम.एच. डी. ३३७९ चा समावेश आहे. याप्रकरणी परतूर पोलिसात आरोपी चालक स. फेरोज स. मोईन रा. परतूर, मालक मोहन सुधाकर देशपांडे रा. परतूर, चालक शे. मुक्तार शे. खाजामिया रा. रोहिणा, मालक बालासाहेब चक्रधारी वाघमारे रा. नागापूर, चालक शे. अबू शे. अजीज यांच्याविरूध्द परतूर पोलिसात गुन्हा दाखल झाला. ही कारवाई तहसीलदार विनोद गुंडमवार, पोलिस निरीक्षक प्रेरणा कट्टे, मंडळ अधिकारी एस. आर. वरफळकर, तलाठी पंडित काकडे, एस. बी. चव्हाण,क्षीरसागर, एच. बी. दळवी यांनी ही कारवाई केली. वाळूसह ट्रॅक्टर जप्त करण्यात आले आहेत.
वाळू चोरणारे तीन ट्रॅक्टर पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2015 23:19 IST