शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

वाळू तस्करीत पोलीस, आरटीओचे साटेलोटे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2016 00:05 IST

औरंगाबाद : जिल्हा प्रशासनाच्या आदेशानुसार वाळूची तस्करी करणाऱ्यांना चाप लावण्यासाठी आरटीओंनी पोलिसांना सोबत घेतले;

औरंगाबाद : जिल्हा प्रशासनाच्या आदेशानुसार वाळूची तस्करी करणाऱ्यांना चाप लावण्यासाठी आरटीओंनी पोलिसांना सोबत घेतले; परंतु त्यांच्यातच साटेलोटे असल्यामुळे एक ट्रक पळाल्याची माहिती उघडकीस आली आहे. वाळूची तस्करी रोखण्यात प्रशासनातील यंत्रणा टोलवाटोलवी करीत असल्यामुळे चोरटी वाहतूक फोफावली आहे. दोन दिवसांत १० ब्रास वाळू घेऊन जाणारा एक ट्रक महसूल पथकाच्या हाती लागला; परंतु आरटीओ अधिकाऱ्यांनी दिलेली ढील आणि पोलिसांनी तक्रार नोंदविण्यात दाखविलेल्या असमर्थतेमुळे ट्रकमालकाने आपल्या टोळीसह धूम ठोकली. उपविभागीय अधिकारी शशिकांत हदगल, तहसीलदार रमेश मुंडलोड यांच्याकडे रविवारी रात्री घडलेल्या या प्रकाराचा पूर्ण लेखी मसुदा सोमवारी आला असून, घडलेला सर्व प्रकार भयावह आणि थक्क करणारा आहे. तहसीलदार मुुंडलोड यांनी सांगितले, रविवारी रात्री एमएच-१२ आर-९४७९ हा १० ब्रास घेऊन जाणारा वाळूचा ट्रक नगरनाका येथे पकडला. ट्रकमध्ये खाली वाळू आणि वर लाकडांचा थर होता. मंडळ अधिकाऱ्यांना पथकाला ट्रक पकडल्याची माहिती दिली. पथकाने नगरनाक्यावर ट्रक अडविला. आरटीओचे वाहन निरीक्षक नागरे तेथे होते. महसूलच्या पथकाने नागरे यांना ट्रक पोलीस अथवा तहसीलमध्ये जमा करण्यास सांगितले. परंतु नागरे यांनी ट्रक दंडात्मक कारवाई करण्यासाठी वजन काट्याकडे नेण्याचे सांगितले, त्या ट्रकमध्ये मंडळ अधिकारी, कोतवाल बसले. त्याच वेळी ट्रकमालक सिद्दीकी पहेलवान व त्यांचे १२ साथीदार नगरनाका परिसरात आले. त्यांनी मंडळ अधिकारी, कोतवालला खाली उतरवून ट्रक पळवून नेला. नागरेदेखील तेथून निघून गेले. छावणी पोलिसांत याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यासाठी गेल्यावर पोलिसांनी मुद्देमाल आणला तर गुन्हा दाखल करण्यात येईल, असे सांगून महसूलच्या पथकाला ठाण्यातून पिटाळले. या प्रकरणाची जिल्हाधिकारी आणि अप्पर जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात येईल.