बीड : पर्यावरण मंत्रालयाची वाळू ठेक्याला परवानगी मिळाल्यानंतर जिल्ह्यातील तीन वाळूपट्ट्यांसाठी ३० मे रोजी निविदा खुल्या केल्या होत्या; मात्र त्यानंतर १५ दिवस उलटून गेले तरी एकाही वाळू ठेकेदाराने रीतसर निविदा भरल्या नसल्याचे शुक्रवारी समोर आले आहे.दीड वर्षांपासून जिल्ह्यातील एकूण १५ वाळूपट्ट्यांतील वाळू उपशासाठी बंदी होती. मात्र मेच्या शेवटच्या आठवड्यात पर्यावरण मंत्रालयाने जिल्ह्यातील काही वाळू पट्ट्यांचे लिलाव करण्याच्या दृष्टिकोनातून निविदा खुल्या केल्या आहेत. यामध्ये गेवराई तालुक्यातील तपेनिमगाव, पांचाळेश्वर, तर माजलगाव तालुक्यातील सांडस चिंचोली येथील वाळूपट्ट्यांचा समावेश आहे. जिल्हा प्रशासनाने ३० मे रोजी वरील वाळूपट्ट्याच्या निविदा खुल्या केल्या आहेत. निविदा खुला करून १७ दिवसांचा कालावधी उलटला तरीदेखील एकही निविदा गौणखनिज विभागाकडे आली नाही. निविदा भरण्याची ७ जुलै २०१६ ही शेवटची तारीख आहे.चोरट्या मार्गाने वाळू वाहतूकवाळू ठेका घेऊन लाखो रुपये गुंतवण्यापेक्षा चोरट्या मार्गाने वाळू उपसा करण्याचे प्रमाण अधिक आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार चोरट्या मार्गाने वाळू उपसा सुरू असल्याने बहुतांश ठेकेदार रीतसर ठेका भरून वाळू उपसा करण्याकडे दुर्लक्ष आहे. (प्रतिनिधी)
१५ दिवस उलटूनही वाळू निविदा नाहीत
By admin | Updated: June 18, 2016 00:59 IST