ईट : मानूर मठाचे नूतन मठाधिपती श्रीषब्र १०८ विरुपाक्ष गुरुगिरी शिवाचार्य महाराज मानूर यांच्या हस्ते ईट व परिसरातील लिंगायत समाजाच्या ७५ बटूंनी सामूहिक शिवदीक्षा समारोह २८ आॅगस्ट रोजी येथील श्री सिद्धेश्वर मंदिरात पार पडला.सकाळी १२ वाजता नूतन मठाधिपतींचे आगमन झाले. त्यानंतर सजवलेल्या रथामधून वाजता-गाजत बँड पथकासह गावातील मुख्य रस्त्यावरून भव्य मिरवणूक काढण्यात आली. श्री सिद्धेश्वराला लघुरुद्राभिषेक करण्यात आला. ही मिरवणूक सिद्धेश्वर मंदिरात आल्यानंतर भूम, पाथरूड, ईट आदी ठिकाणांहून आलेल्या ७५ स्त्री-पुरुषांना विरुपाक्ष गुरुगिरी शिवाचार्य महाराज यांनी शिवदीक्षा दिली. यानंतर महाराजांचा आशीर्वचन कार्यक्रम झाला. याप्रसंगी यशस्विनी अभियानाच्या राज्य समन्वयक वैशालीताई मोटे, आण्णासाहेब देशमुख, काकासाहेब चव्हाण, राजाभाऊ हुंबे, प्रताप देशमुख, दासराव हुंबे, सरपंच विद्या अहिरे, माजी सरपंच सुलभाताई चव्हाण, उपसरपंच प्रवीण देशमुख, अशोक देशमुख, तंटामुक्तीचे अध्यक्ष दत्ता आसलकर, ग्रा.पं. सदस्य शंभूराजे देशमुख, विद्या जंगम, सचिन खामकर, शिवा संघटनेचे तालुकाध्यक्ष प्रवीण शेटे, काँग्रेसचे वैजिनाथ म्हमाणे यांच्यासह समाजबांधव व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. शास्त्री म्हणून प्रकाश शास्त्री देवळालीकर, शिवकुमार स्वामी यांनी काम पाहिले. सूत्रसंचालन विनोद वाडकर, तर आभार सोमेश्वर स्वामी यांनी केले. कार्यक्रमासाी जितेंद्र चिखले, राजू पळसे, अमर हांडगे, रोहित स्वामी, नानासाहेब कानडे, गणेश फल्ले, रवी वाडकर, कैलास फल्ले, मंगेश चौरे, निलेश चिखले, अनिल देशमाने, सचिन स्वामी आदींनी पुढाकार घेतला. (वार्ताहर)
७५ बटूंनी घेतली सामुहिक दीक्षा
By admin | Updated: August 29, 2016 00:54 IST