शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

समृद्धी महामार्गाच्या कंत्राटदाराला ३२८ कोटी रुपये दंड भरावाच लागणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:02 IST

औरंगाबाद : समृद्धी महामार्गाचे कंत्राटदार मेसर्स मॉन्टे कार्लो लि. यांना अवैध गौण खनिज उत्खनन केल्याबाबत जालन्याचे तहसीलदार ...

औरंगाबाद : समृद्धी महामार्गाचे कंत्राटदार मेसर्स मॉन्टे कार्लो लि. यांना अवैध गौण खनिज उत्खनन केल्याबाबत जालन्याचे तहसीलदार यांनी ठोठावलेल्या ३२८ कोटी रुपयांच्या दंडाविरुद्ध कंत्राटदार संस्थेने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल केलेल्या तीन वेगवेगळ्या याचिका न्यायमूर्ती मंगेश पाटील यांनी बुधवारी फेटाळल्या.

यासंदर्भात खंडपीठाने यापूर्वी दिलेली अंतरिम स्थगिती उच्च न्यायालयाच्या आदेशाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात अपील दाखल करेपर्यंत कायम ठेवण्याची कंपनीची विनंतीसुद्धा खंडपीठाने अमान्य केली. परिणामी कंपनीला ३२८ कोटी रुपये दंड भरावाच लागणार आहे.

नेमके काय आहे प्रकरण

जालना - औरंगाबाददरम्यानच्या समृद्धी महामार्गाच्या बांधकामासाठी मेसर्स मॉन्टे कार्लो कंपनी लिमिटेड यांना कंत्राट देण्यात आले आहे. जालन्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी वेळोवेळी उत्खननासाठी परवानगी दिली होती. परंतु मॉन्टे कार्लो कंपनीने अवैधरीत्या गौण खनिजाचे उत्खनन, वापर, वाहतूक व साठवणूक केल्याचे आढळले. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर शासनाचा महसूल बुडाला अशी तक्रार बदनापूरचे माजी आमदार संतोष सांबरे यांनी जालन्याच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. जिल्हाधिकाऱ्यांनी समिती स्थापन करून अवैध गौण खनिज उत्खननाबाबत चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. समितीने उत्खनन केलेल्या स्थळांची पाहणी करून निरीक्षण केले असता कंपनीने परवानगी नसलेल्या जालना व बदनापूर तालुक्याच्या हद्दीतील गटामधून विनापरवानगी, अवैधरीत्या गौण खनिजाचे उत्खनन करून वापर व साठवणूक केलेल्याचे आढळले होते.

तहसीलदारांनी ठोठावला ३२८ कोटी रुपयांचा दंड

दिलेल्या परवानगीच्या मर्यादेपेक्षा कंपनीने जास्त गौण खनिजाचे उत्खनन केल्याच्या समितीच्या अहवालावरून तहसीलदारांनी मॉन्टे कार्लो कंपनीला १६५ कोटी, ८७ कोटी व ७७ कोटी अशा तीन टप्प्यात एकूण ३२८ कोटी रुपयांचा दंड ठोठावला होता. तहसीलदारांनी ठाेठावलेल्या दंडाविरुद्ध कंपनीने तीन वेगवेगळ्या याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल केल्या होत्या. खंडपीठाने यापूर्वी दंड वसुलीला अंतरिम स्थगिती दिली होती.

कंपनीने दाखल केली थेट खंडपीठात याचिका

मूळ तक्रारदार माजी आमदार सांबरे यांनी ॲड. विष्णू मदन पाटील, ॲड. अमरजीतसिंह गिरासे व ॲड. ललित महाजन यांच्या मार्फत हस्तक्षेप अर्ज दाखल केला होता. त्यांनी हस्तक्षेपकाच्या वतीने खंडपीठाच्या निदर्शनास आणून दिले की, तहसीलदारांच्या आदेशाविरुद्ध कंपनीने महाराष्ट्र जमीन महसूल कायद्याच्या कलम २४७ अन्वये जिल्हाधिकाऱ्यांकडे अपील दाखल करावयास हवे होते. परंतु कंपनीने जिल्हाधिकाऱ्यांकडे अपील दाखल न करता उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्या आहेत. त्यामुळे सदर याचिका फेटाळाव्यात, अशी विनंती केली. सुनावणीअंती खंडपीठाने वरीलप्रमाणे आदेश दिले. शासनाच्या वतीने अतिरिक्त सरकारी वकील सिद्धार्थ यावलकर यांनी बाजू मांडली.