औरंगाबाद : महाराष्ट्र राज्य समाज कल्याण कर्मचारी संघटनेतर्फे (गट-क) सोमवारी विविध मागण्यांसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनसमोर निदर्शने करण्यात आली. यामध्ये मोठ्या संख्येने कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदविला. आपल्या मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांतर्फे आठवडाभर काळ्या फिती लावून कामकाज करण्यात येत आहे.१ जून २०१६ चा अत्यल्प कर्मचाऱ्यांचा शासन निर्णय रद्द करणे, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समित्यांच्या कर्मचारी समायोजनाची अंमलबजावणी त्वरित थांबविणे, प्रत्येक जिल्हा समितीस पूर्वीप्रमाणे १२ कर्मचाऱ्यांचा आकृतिबंध करणे, वर्ग-२ दर्जाच्या अधिकारी व काही कर्मचाऱ्यांसह तालुकास्तरीय समाजकल्याण कार्यालय सुरू करणे, तीन वर्षे पूर्ण केलेल्या निवासी शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना त्वरित शासन सेवेत नियमित करणे, गृहपालांना पदोन्नती देण्यात यावी इ. मागण्यांसाठी ही निदर्शने करण्यात आली.याप्रसंगी संघटनेचे उपाध्यक्ष सुभाष बरोदे, राज्य कार्यकारिणी सहसचिव सुमित्रा साळुंके, दख्खन पटेल, संजय दडपे, वैशाली कळासरे, मानसी कुलकर्णी, शंकर माकू, मनोहर वनकर, एम. एफ. शेख, गौतम धनेधर, भाऊसाहेब सरवदे, मनोज किंबहुने, दत्ता वाघ, प्रकाश त्रिभुवन, मंगला राणे, सुदर्शन चव्हाण, परमेश्वर पवार, संदीप कांबळे आदी कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती. मागण्यांसाठी कर्मचारी काळ्या फिती लावून काम करीत आहेत.
समाज कल्याण कर्मचाऱ्यांची निदर्शने
By admin | Updated: August 10, 2016 00:27 IST