जालना : भेसळयुक्त व बनावट आयुर्वेदीक औषध विक्रीसाठी ठेवल्याप्रकरणी तीन जणाविरूद्ध सोमवारी सदर बाजार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शहरातील अमर छायाटॉकिज परिसरातील श्रीहरी आयुर्वेदीक औषध दुकानावर ३ जुलै रोजी अन्न व औषधी प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकला होता. या छाप्यात विविध आयुर्वेदीक औषधीचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. तपासणी अहवालात त्यातील काही औषधीही भेसळयुक्त तर काही औषध बनावट लेबल लावून विक्रीसाठी ठेवल्याचे निष्पन्न झाले. त्या अहवालावरून औषधी निरीक्षक गोपालदास बजाज यांच्या फिर्यादीवरून कृष्णा मुजमुले, अरूण सुरासे व प्रेम (पूर्ण नाव माहित नाही) या तिघांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.इंदेवाडीत सात जणाविरूद्ध गुन्हाजालना : शहरानजीक असलेल्या इंदेवाडी पाण्याच्या टाकीजवळ क्षुल्लक कारणावरून एकास जबर मारहाण करून कारच्या काच्या फोडण्यात आल्या. ही घटना रविवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास घडली. राजू गायवाड हे आपल्या घरा समोर असताना जनार्धन जाधव अन्य सहा जणांनी त्याना मागील भांडण्याच्या कारणावरून जबर मारहाण केली. गायवाड यांच्या पत्नीलाही मारहाण करून मुक्का मार दिला. तसेच त्यांच्या कारच्या काचा फोडल्या या प्रकारावरून परिसरात एकच खळबळ उडाली होती. याप्रकरणी तालुका जालना पोलिस ठाण्यात जनार्धन जाधव, अंकुश जाधव, रवि जाधव, गजेंद्र जाधव, राहुल जाधव, आनंद जाधव, शरद जाधव, अविनाश जाधव विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पैकी एकास पोलिसांनी अटक केली. याप्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक पाटील हे करीत आहे. (प्रतिनिधी)
भेसळयुक्त औषध विक्री; तिघांवर गुन्हा
By admin | Updated: October 27, 2015 00:19 IST