शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

सखी मंचचा ‘रिमझिम गाणी झलक सुहानी’

By admin | Updated: July 23, 2016 01:18 IST

पहिला पाऊस पडून गेलेला आहे. निसर्गाने हिरवाकंच शालू पांघरला असून धरणीमाता पावसाने चिंब झाली आहे.

औरंगाबाद : आला पुन्हा तो नव्यानं.. ओला मातीचा सुगंध..मन झाले एकवार.. पुन्हा बेहोष बेधुंद..पहिला पाऊस पडून गेलेला आहे. निसर्गाने हिरवाकंच शालू पांघरला असून धरणीमाता पावसाने चिंब झाली आहे. रसिकतेला आव्हान देणाऱ्या या रोमांचक वातावरणात हळूच सुरेल तान कानावर पडावी अन् मन बेभान होऊन नाचू गाऊ लागावे, असे वाटते. नेमका या वातावरणाचा रंग ओळखून, आपल्या असंख्य सखींच्या मनातील भाव ओळखून पुन्हा एकदा कलर्स प्रस्तुत लोकमत सखी मंचने ‘रिमझिम गाणी झलक सुहानी’ हा कार्यक्रम आणला आहे.गोवा आणि महाराष्ट्रात ज्याप्रमाणे लोकमत सखी मंचने आपल्या सदस्यांसाठी विविधरंगी कार्यक्रम देऊन त्यांच्या मनात घर केलं, त्याचप्रमाणे कलर्सने देखील प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून पुन्हा एकदा कलर्स व लोकमत सखी मंच आपल्या भेटीला येत आहेत. या कार्यक्रमात असणार आहेत आपल्या मनातली गाणी, पाऊस गाणी आणि सोबतच नृत्याची ‘झलक दिखला जा’ स्पर्धा. या नृत्य स्पर्धेत केवळ १० स्पर्धकांना प्रवेश घेता येणार आहे. पुन्हा एकदा कलर्स चॅनलवर ३० जुलै, शनिवारपासून रात्री १० वा. ‘झलक दिखला जा हॉट है’ हा शो सुरू होणार आहे. यावेळचे मुख्य आकर्षण म्हणजे २००६ ची मिस युनिव्हर्स श्रीलंका आणि सुप्रसिद्ध मॉडेल- अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस या कार्यक्रमाची सेलिब्रिटी जज असणार आहे. तिच्या सहभागाने या कार्यक्रमाला आलेले एक ग्लॅमरस आणि सिझलिंग स्वरूप या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य असेल. याशिवाय सुप्रसिद्ध सिनेदिग्दर्शक करण जोहर, कोरिओग्राफर गणेश हेगडे हे सुद्धा परीक्षकांच्या भूमिकेत धमाल करताना दिसणार आहेत. एकूण १२ सेलिबिटीज या कार्यक्रमात सहभागी होणार असून यात सुरवीन चावला, करिश्मा तन्ना, शक्ती अरोरा, अर्जुन बिजलानी, गौरव गेरा (चुटकी फेम), पूनम शहा- प्रियंका शहा (जुळ्या बहिणी), हरपालसिंग सोखी (शेफ), हेली शाह, नोरा फतेही, सलमान युसूफ खान, सिद्धांत गुप्ता आणि शांतनू माहेश्वरी आदींचा समावेश आहे. बहुरंगी करमणूकदि. २५ जुलै रोजी सायं. ४: ३० वा. संत तुकाराम नाट्यगृह, सिडको येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. चला तर मग, पावसाच्या गाण्यांसोबतच कर्णमधुर संगीत आणि नृत्याच्या दिलखुलास ठेक्यासोबत ‘झलक दिखला जा’ चे स्वागत करूया. ४या कार्यक्रमाचा एक वेगळा ‘कलर’ आम्ही घेऊन येत आहोत, ज्यात असणार आहे डान्स, मस्ती, मनोरंजन आणि धमाल. नृत्य स्पर्धेत भाग घेण्यासाठी ९८५०४०६०१७ या क्रमांकावर स. ११ ते सायं. ५ या वेळेत संपर्क साधावा.