शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

गौरी-गणपतीसाठी सजली बाजारपेठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2017 00:49 IST

रावण अमावास्या अर्थातच पोळा सण साजरा करून श्रावणोत्सव संपला आणि भाद्रपदाच्या आगमनाने सर्वांना गणरायाचे आणि महालक्ष्मीच्या उत्सवाचे वेध लागले.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : बैल पोळ्याच्या तोंडावर आलेल्या पावसाने बळीराजाला सुखावले आणि सर्वत्र पोळ्याचा उत्साह पाहायला मिळाला. श्रावण अमावास्या अर्थातच पोळा सण साजरा करून श्रावणोत्सव संपला आणि भाद्रपदाच्या आगमनाने सर्वांना गणरायाचे आणि महालक्ष्मीच्या उत्सवाचे वेध लागले. अवघ्या चार दिवसांवर गौरी-गणपतीचा सण येऊन ठेपला आहे. दि. २५ आॅगस्ट रोजी गणराय, तर दि. २९ आॅगस्ट रोजी महालक्ष्मीचे आगमन होत आहे. या निमित्ताने सर्वत्र जय्यत तयारीला सुरुवात झाली असून, गौरी-गणपतीच्या स्वागतासाठी बाजारपेठ सजली आहे.या दोन्ही उत्सवांमध्ये सर्वात जास्त महत्त्व असते ते सजावटीला. त्यामुळेच गणेशाच्या मूर्ती, महालक्ष्मीचे मुखवटे यांच्याइतकीच मागणी सजावटीच्या साहित्यालाही दिसून येत आहे. गणपती आणि महालक्ष्मीला लागणारे वेगवेगळे हार, मुकुट, पूजेचे आकर्षक सामान, वेगवेगळ्या प्रकारचे मखर, विविध प्रकारची तोरणे अशा विविधरंगी वस्तूंनी बाजारपेठ फुलून गेली आहे. गणपतीसाठी थर्माकोलच्या मखरांना जास्त मागणी असल्याचे दिसून येते. हे मखर अन्य मखरांच्या तुलनेत स्वस्त आहेत. यामध्ये मंदिर, कमळ, सिंहासन असे विविध आकार उपलब्ध आहेत. १५० रुपयांपासून ते १००० रुपयांपर्यंत याच्या किमती दिसून येत आहेत. महालक्ष्मीसाठी कापडी मखरांमध्ये विविध प्रकार पाहायला मिळतात.गौरी-गणपतीसाठीचे अनेक आकर्षक दागिनेही महिला वर्गाला खुणावत आहेत. मोत्यांचे, फुलांचे हार आणि या हारांना मध्यभागी मोठे पदक असे आपण नेहमीच पाहतो; पण यंदा मात्र हिरव्या पानांचे हार आणि पदकाच्या जागी आंबा, सफरचंद, संत्री या फळांचे पदक असे नावीन्यपूर्ण हार बाजारात आले आहेत. यंदाही ‘जय मल्हार’ पगडीला विशेष पसंती मिळेल, असा कयास आहे. याशिवाय महालक्ष्मीच्या साड्या, कपडे यांचे असंख्य प्रकार बाजारात पाहायला मिळतात.