शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

सागर, स्वप्नील यांनी दर्जेदार खेळाडू घडवावेत : राजेंद्र दर्डा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2018 13:30 IST

मानाचा असा शासनाचा प्रतिष्ठित शिवछत्रपती पुरस्कार मिळवणारे औरंगाबादेतील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडू सागर मगरे आणि स्वप्नील तांगडे यांनी खेळाडू म्हणून त्यांची कारकीर्द गाजवली आहे. आता त्यांनी भविष्यात प्रशिक्षकाच्या भूमिकेत औरंगाबाद येथून दर्जेदार खेळाडू घडविण्यात योगदान द्यावे, अशी अपेक्षा लोकमत समूहाचे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा यांनी व्यक्त केली. औरंगाबाद जिल्हा तलवारबाजी संघटनेतर्फे सागर मगरे आणि स्वप्नील तांगडे या दोघांना नुकताच शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल त्यांचा बुधवारी गजानन महाराज भवन येथे लोकमत समूहाचे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा यांच्या हस्ते एका सोहळ्यात सत्कार करण्यात आला.

ठळक मुद्देशिवछत्रपती पुरस्कारप्राप्त मगरे, तांगडे यांचा सत्कार : तलवारबाजी संघटनेचे कार्य कौतुकास्पद

औरंगाबाद : मानाचा असा शासनाचा प्रतिष्ठित शिवछत्रपती पुरस्कार मिळवणारे औरंगाबादेतील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडू सागर मगरे आणि स्वप्नील तांगडे यांनी खेळाडू म्हणून त्यांची कारकीर्द गाजवली आहे. आता त्यांनी भविष्यात प्रशिक्षकाच्या भूमिकेत औरंगाबाद येथून दर्जेदार खेळाडू घडविण्यात योगदान द्यावे, अशी अपेक्षा लोकमत समूहाचे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा यांनी व्यक्त केली.औरंगाबाद जिल्हा तलवारबाजी संघटनेतर्फे सागर मगरे आणि स्वप्नील तांगडे या दोघांना नुकताच शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल त्यांचा बुधवारी गजानन महाराज भवन येथे लोकमत समूहाचे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा यांच्या हस्ते एका सोहळ्यात सत्कार करण्यात आला.या प्रसंगी अखिल भारतीय तलवारबाजी महासंघाचे कोषाध्यक्ष अशोक दुधारे, राज्य संघटनेचे सचिव उदय डोंगरे, जिल्हा संघटनेचे अध्यक्ष एस. पी. जवळकर, सचिव दिनेश वंजारे, बबन डिडोरे आणि नगरसेवक राजू वैद्य यांची प्रमुख उपस्थिती होती. राजेंद्र दर्डा यांच्या हस्ते राष्ट्रीय निवड समितीवर सदस्य म्हणून निवड झालेले डॉ. उदय डोंगरे आणि तलवारबाजी खेळात पीएच.डी. करणारे दिनेश वंजारे यांचाही सत्कार करण्यात आला. स्वप्नील तांगडे आणि सागर मगरे यांनी राज्य व राष्ट्रीय पातळीवर चांगली कामगिरी केली. स्वप्नील जागतिक पातळीवरही खेळला. त्यामुळे या शहराचा नागरिक म्हणून आपल्याला आनंद वाटतोय. हे दोघेही प्रशिक्षकाची भूमिका पार पाडत आहेत. या दोघांनी तलवारबाजी खेळातील दर्जेदार खेळाडू घडवावे व त्यांना सर्व सहकार्य करतील, अशी अपेक्षा आहे. या दोघांना मिळालेल्या पुरस्कारामुळे तलवारबाजी संघटनेचेही कौतुक वाटते, असेही या प्रसंगी राजेंद्र दर्डा यांनी सांगितले.प्रास्ताविक राज्य संघटनेचे सचिव डॉ. उदय डोंगरे यांनी केले. राजेंद्र दर्डा यांचा पाठिंबा आणि मार्गदर्शन तलवारबाजी संघटनेला नेहमीच असते. औरंगाबाद शहराने ५ शिवछत्रपती पुरस्कार विजेते आणि २५ ते ३0 आंतरराष्ट्रीय खेळाडू दिले आहेत. औरंगाबाद शहरात आॅलिम्पियन खेळाडू घडवण्याचे आमचे ध्येय असल्याचे उदय डोंगरे यांनी सांगितले. आभार एस. पी. जवळकर यांनी मानले.

टॅग्स :Rajendra Dardaराजेंद्र दर्डा