शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

शेतकºयांची नागपंचमी बँकेसमोरच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2017 00:03 IST

मुखेड/लोहा : नागपंचमीनिमित्त घरोघरी गोडधोड केले जाते़ झोके बांधून खेळणे, हातावर मेहंदी काढणे, महिला व पुरुष एकत्र भुलई खेळणे, वारूळाला गाणे म्हणणे असा सण एकीकडे उत्साहात साजरा होत असताना दुसरीकडे या सणावर पाणी सोडत शेतकºयांनी पीकविमा भरण्यासाठी रात्री मुक्कामी राहून बँकेसमोर उभे राहून हा सण साजरा करण्याचे विदारक चित्र मुखेड, लोहा आदी तालुक्यात पहावयास मिळाले़

लोकमत न्यूज नेटवर्कमुखेड/लोहा : नागपंचमीनिमित्त घरोघरी गोडधोड केले जाते़ झोके बांधून खेळणे, हातावर मेहंदी काढणे, महिला व पुरुष एकत्र भुलई खेळणे, वारूळाला गाणे म्हणणे असा सण एकीकडे उत्साहात साजरा होत असताना दुसरीकडे या सणावर पाणी सोडत शेतकºयांनी पीकविमा भरण्यासाठी रात्री मुक्कामी राहून बँकेसमोर उभे राहून हा सण साजरा करण्याचे विदारक चित्र मुखेड, लोहा आदी तालुक्यात पहावयास मिळाले़३१ जुलै ही पीक विमा भरण्याची शेवटची तारीख असल्याने शेतकºयांनी मुखेड येथील स्टेट बँक आॅफ इंडिया, सेंट्रल बँक आॅफ इंडियासमोर मोठी गर्दी केली़ आॅनलाईन सेवा व्यवस्थित चालत नसल्याने कामे खोळंबत आहेत़ त्यामुळे संतप्त शेतकºयांनी दुसºया दिवशीही मुखेडात रास्ता रोको केला़ शेतकºयांचा विमा आॅफलाईन भरून द्यावा असे आदेश प्रशासनाने दिले असतानाही बँकांनी तो धुडकावल्यामुळे शेतकरी रस्त्यावर उतरून असंतोष व्यक्त करीत होते़ बँकांच्या विरोधात शेतकºयांनी निदर्शने केली़ याची दखल घेवून पोलिस निरीक्षक राजेंद्र सहाणे, नायब तहसीलदार पी़डी़ गंगनर आदींनी बँक अधिकाºयांची भेट घेवून परिस्थिती समजावून सांगितली व आॅनलाईन ऐवजी आॅफलाईन अर्ज घेण्यास सुरुवात केल्याने परिस्थिती निवळून वाहतूकही सुरळीत झाली़ याकामी बालाजी कबनूरकर, वसंत संबुटवाड, डॉ़श्रावण रॅपनवाड, शिवाजी राठोड, अशोक गजलवाड, नगरसेवक विनोद आडेपवार, राजकुमार बामणे, गंगाधर पिटलेवाड, दिलीप कोडगिरे, शिवकुमार बंडे, सुनील अरगिळे, शिवाजी गेडेवाड, संतोष इंगोले, संतोष बनसोडे, संदीप कांबळे, सुरेश वडजे, संजय वडजे, पद्मसिंह वडजे, गौसअली सलगरकर, माधव टेकाळे यांनी परिश्रम घेतले़सर्व कामे सोडून आॅनलाईन केंद्रासमोर तसेच बँकेसमोर रांगा लावून बसण्याची वेळ आल्याने शेतकरी रडकुंडीला आला़ बँक केवळ सकाळी ११ ते २ या कालावधीत पीक विमा भरून घेत असल्याने बँक प्रशासन व शेतकºयांत खटके उडत आहेत़ सीएससी केंद्र चालक जादा रक्कम उकळत असल्याने शेतकरी संताप व्यक्त करीत आहेत़ लोहा शहरात जवळपास १० ते २० सीएससी आॅनलाईन केंद्र आहेत़ पेरणीपासून ते काढणीनंतर पुढील १४ दिवसापर्यंत पिकांना पंतप्रधान पीक योजनेचा लाभ होणार असून निसर्गच्या लहरी कारभारापासून पिकांना विमा संरक्षण मिळावे यासाठी पीक विमा काढण्याकडे शेतकºयांचा ओढा मोठ्या प्रमाणात वाढला आहे़